दिवंगत केशरबाई आढाव कुटुंबियांच्या आधारस्तंभ होत्या!: महेश भोसले

जामखेड (प्रतिनिधी) घरची परिस्थिती बेताची असताना शिक्षण घेत प्राथमिक शिक्षिका ते विस्तार अधिकारी असा प्रवास असलेल्या दिवंगत केशरबाई अर्जुनराव आढाव या
कुटुंबियांच्याच नव्हे तर नातेवाईकांच्या देखील आधास्तंभ होत्या.कोणत्याही नातेवाईकांची त्या विचारपूस करत.स्वभावाने शिस्तप्रिय असल्या तरी त्या मनाने प्रेमळ होत्या.प्रतिकूल परिस्थितीत कमी पगारामध्ये घर चालविण्याचे कसब त्यांच्यात होते.त्या एक उत्तम प्रशासक असल्याचे प्रतिपादन देशस्तंभ न्यूज नेटवर्क चे संपादक महेश भोसले यांनी केले. जामखेड येथे आयोजित जलदानविधी कार्यक्रमात डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन येथे ते बोलत होते. भंते गोविंद गायकवाड यांनी त्रिशरण पंचशील घेत बौद्ध पद्धतीने विधी पार पाडला.यावेळी अर्जुनराव धुराजी आढाव (गुरुजी),जितेंद्र आढाव(मुलगा), सौ.शीतल आढाव (कदम),उपेंद्र आढाव (मुलगा),सौ.अर्चना आढाव (भोसले) तसेच आढाव परिवारातील सर्वजण उपस्थित होते.सदर जलदान विधी कार्यक्रमास
पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या जिल्हा अध्यक्षा गौतमी भिंगारदिवे, पद्मावती भोसले, देशस्तंभ न्यूज नेटवर्क चे उप संपादक सुरेश भिंगारदिवे सुजाता पवार, सुवरणा धाकतोडे,वंदना मिसाळ,वंदना गंगावणे , गंगावणे,दगेश्वर गंगावणे,संग्राम कदम, गाडे सर,नितीन वाहवल,सुशीला वाघमारे, गव्हाळे अक्का, हितेंद्र गव्हाळे ,संजय साखरे,शिल्पा साखरे,अक्षय गाडे,विवेक धाकतोडे,आदित्य पवार,राहुल कदम, सिदार्थ कदम, रजनीकांत साखरे,बाळासाहेब मोरे,नारायण राऊत,निलेश कांबळे,मनोज कांबळे,तय्यब शेख,अशोक घोडेस्वार,प्रताप पवार,विजय जाधव,गोकुळ गायकवाड,जालिंदर यादव,सुशील पौळ,विनोद सोनवणे,संजय घोडके,संजय समुद्र,महेंद्र कदम,सूर्यकांत कदम,हरिभाऊ कदम,रवींद्र निकाळजे, दिपक तूपेरे,रवी सोनवणे,विनोद घायतडक,विकी सदाफुले, सनी सदाफुले,सुजित थनवे,श्रीधर सिध्देश्वर तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.