आधार कॅम्प नोंदणी अभियानास ठिकठिकाणी प्रतिसाद

शेवगाव ( प्रतिनिधी)
शेवगाव तहसील मधील आधार केंद्र चालक श्री आसिफ सय्यद यांच्या मार्गदर्शनखाली किट ऑपरेटर अशोक सौदागर, योगेश खर्चन आणि अतीश सोनवणे यांनी गेल्या महिन्याभरात तालुक्यात भरपूर ठिकाणी शाळेत,अंगणवाडीत आधार नोंदणी कॅम्प लाऊन नवीन आधार नोंदणी करण्याच्या सरकारच्या योजनेला चांगल्याच प्रकारे हातभार लाऊन खेडो पाडी वड्यावस्त्यवर जाऊन त्रास सहन करून लोकांची सेवा केली व सरकारच धोरण राबून
नवीन नोंदणी अभियानाचा उद्देश सफल करण्यात मोलाची साथ दिल्यामुळे सर्व स्तरातून आधार केंद्रप्रमुख श्री आसिफ सय्यद सर व त्यांचे सहकाऱ्यांचे अभिनंदन होत आहे. अशीच सेवा त्यांनी पुढील काळात देखील करावी अशी त्यांच्याकडून अपेक्षा लोक करत आहे. लोकांच्या अपेक्षा व सरकारी धोरण यात ते कोठेही कमी पडणार नाही याची सर्वांना खात्री आहे. त्यांच्या सर्व टीमने केलेल्या कामा बद्दल सावली दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष चाँद शेख व पदाधिकारी यांनी आभार व्यक्त केले.तसेच येणाऱ्या पुढील काळात अशीच सेवा त्यांच्याकडून घडत राहो.शेवगाव तालुक्यातील नागरिकांकडून त्यांच्या या कामाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.