नगर जिल्ह्यातल्या १२३ गावठी दारुभट्ट्या उध्वस्त! ७ लाख १८ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेने केला उध्वस्त!

अहमदनगर (प्रतिनिधी)नगर जिल्ह्यातल्या १२३ गावठी दारुभट्ट्या उध्वस्त करत ७ लाख १८ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेने केला उध्वस्त केला असल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून मिळाली आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या आदेशानुसार जिल्हा गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या पुढाकारातून १२३ ठिकाणच्या गावठी दारुच्या हातभट्ट्या उध्वस्त करण्यात आल्या. यासाठी राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेदरम्यान ही कारवाईतून ७ लाख १८ हजार २८ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
नगर जिल्ह्यात विविध ठिकाणी गावठी हातभट्टीच्या भट्ट्या अनेक दिवसांपासून सुरु होत्या. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील
यांनी स्थानिक गुन्हे शाखेला आदेश दिले, की ‘दि. १५ जूलै ते ३१ जूलै २०२२ दरम्यान अवैध धंदे आणि गावठी हातभट्ट्या उध्वस्त करा’. त्या आदेशानुसार नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकारी आणि कर्मचार्यांनी १२३ ठिकाणी छापे टाकून गावठी दारुच्या हातभट्ट्या उध्वस्त केल्या.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश इंगळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे, पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे आणि ठाणे अंमलदारांनी या कारवाईत भाग घेतला.
जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर आदींसह सर्व उपविभागीय पोलीस अधिकार्यांच्या सूचना आणि मार्गदर्शन या कारवाईसाठी मिळाले असल्याने ही मोठी कारवाई झाली असल्याचे समजते.