प्रगत विद्यालयात कायदेविषयक जागृती कार्यक्रम

अहमदनगर दि.२३ डिसेंबर (प्रतिनिधी)
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अहमदनगर व प्रगत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यांचे संयुक्त विद्यमाने बुधवार दिनांक 21 डिसेंबर २०२२ रोजी प्रगत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय गांधी मैदान अहमदनगर येथे मानवी हक्क, अँसिड हल्ल्यातील पीडितांचे अधिकार व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा या विषयावर जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मा. सुधाकर यार्लगड्डा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षा माननीय श्रीमती भाग्यश्री पाटील, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अहमदनगर या होत्या. i
त्यांनी अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना संबोधित करताना आपल्यावर होणारे संस्कार आणि संस्कृतीचा ठेवा या दोन्ही बाबी आपण जपल्या पाहिजेत, असे सांगून बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील तरतुदी सोप्या भाषेत सांगितल्या.
मा. श्रीमती. अंजली केवळ मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना चांगला स्पर्श व वाईट स्पर्श तसेच बालकांवर होणारे अत्याचार त्याबाबतचे कायदे या विषयी माहिती दिली. माननीय श्री. सुनील मुंदडा, सदस्य, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अहमदनगर यांनी मानवी हक्क व कायदे याविषयी बोलताना विद्यार्थ्यांना प्रकृती, संस्कृती व विकृती यावर उदाहरण देऊन विद्यार्थ्यांना आपल्या संस्कृतीचे महत्त्व पटवून दिले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक माननीय श्री सुनील पंडित प्राचार्य प्रगत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यांनी केले. सर्व पाहुण्यांचा परिचय विद्यालयाच्या सहशिक्षिका श्रीमती आशा मगर यांनी केले. तसेच कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून अँड श्री. भूषण बराटे अँड. श्री अभय राजे व अँड. श्रीमती. स्वाती नगरकर, सदस्य, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अहमदनगर हे उपस्थित होते. अँड. चैताली खिल्लारी तसेच मोहटा देवी ट्रस्टचे विश्वस्त अँड. विक्रम वाडेकर हे कार्यक्रमास उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. दिलीप रोकडे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीमती. सुष्मा नगरकर यांनी केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी व थ जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे श्री. स्वप्निल परदेशी, श्री. विकास कर्डिले व श्री विलास दिघाडे यांनी सहकार्य केले.