तोफखाना पोलीस स्टेशनचा पोलीस नाईक लाचेच्या जाळ्यात!

अहमदनगर (प्रतिनिधी) तोफखाना पोलीस स्टेशनचा पोलीस नाईक लाचेच्या जाळ्यात अडकल्याची माहिती समोर आली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे.याबाबतची सविस्तर अशी की
पाईपलाईन रोडवरील सिटी स्टोअर या ठिकाणी ३० हजार रुपयांची लाच घेताना एसीबीच्या पथकाने पकडले. मंगळवारी दुपारी
पोलीस नाईक शैलेश गोमसाळे आणि वैभव साळुंके (वय 35, रा. अहमदनगर) अशी आरोपींची नावे आहेत. नगर शहरातील 35 वर्षीय तक्रारदाराला विनापरवाना दारू विक्री करण्याची परवानगी देऊन त्याच्यावर कायदेशीर कारवाई न करण्याच्या मोबदल्यात आरोपी गोमसाळे यांने वैभव साळुंके यांच्यामार्फत दर महिन्याला ३० हजार रुपये हप्ता घेण्याचे मान्य केले होते. बुधवारी दुपारी आरोपी वैभव साळुंके एकविरा चौकातील सिटी स्टोअर या ठिकाणी लाच स्वीकारत असताना त्याला नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिकच्या पोलीस निरीक्षक साधना इंगळे, पोलीस हवालदार सचिन गोसावी, प्रफुल माळी, चंद्रशेखर मोरे, संतोष गांगुर्डे, पोलीस नाईक शरद हेंबाडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.