एमआयडीसी पोलिसांनी केले परप्रांतीयांना लुटणाऱ्या गुन्हेगारांना २४ तासात गजाआड!

अहमदनगर दि.२२ मे (प्रतिनिधी)-एमआयडीसी पोलिसांनी परप्रांतीयांना लुटणाऱ्या गुन्हेगारांना २४ तासात गजाआड केले आहे.
आकाश गोकुळ चव्हाण (वय २१, रा.केडगाव अहमदनगर), जितेंद्र रविंद्र क्षेत्रे (वय-३० रा.बालीकाश्रम रोड सुडकेमळा अहमदनगर) असे पकडण्यात असलेल्यांची नावे आहेत.
जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल व नगर ग्रामीण उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पो नि अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सपोनि युवराज आठरे यांच्या सूचनेनुसार पोसई दिपक पाठक, पोसई हंडाळ सो, सफौ लोखंडे, पोहेकॉ नंदकिशोर सांगळे, पोना चांगदेव आंधळे, पोना साबीर शेख, पोना महेश दाताळ, पोकॉ किशोर जाधव, पोकॉ. सचिन हरदास, चालक पोहेकॉ गिरवले, चालक पोहेकॉ संदीप खेंगट, चालक पोहेकॉ देशमुख आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
याबाबत समजलेले माहिती अशी की, दि. १९ मे २०२२ रोजी रात्री १०.३० वा च्या सुमारास ॲटोरिक्षाने पुणे स्टॅण्ड येथून एमआयडीसी अहमदनगर येथे येत असतांना रिक्षातील दोघांनी राहुल वार्डन्सजवळ घेऊन जावून त्यांना लाकडी दांडके तसेच लाथाबुक्यांनी मारहाण केली. ताब्यातील १ हजार २०० रु किमतीचा पाँवर गाल्सचा गॉगल, हातातील घडयाळ, ३ हजार १०० रु रोख रक्कम ५ हजार रु किमतीचा एमआय नोट फोर कपंनीचा मोबाईल असा एकुण ९ हजार ५०० रु किमतीचा मुददेमाल बळजबरीने काढून घेतला. मारहाण करून एमआयडीसी परिसरात सोडून दिले, या नरेंद्र श्रीसंतोष विश्वकर्मा (वय २२, रा. बंगवार कॉलनी ता. सुहागपुर जि. सहडोल मध्यप्रदेश)यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गु रजि नं. ३५२ / २०२२ भादवि कलम ३९४.३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या दाखल गुन्ह्याचा तपास सुरु असताना हा एमआयडीसी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि युवराज आठरे यांना गोपनिय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की गुन्हा हा आरोपी आकाश गोकुळ चव्हाण (रा. केडगाव अहमदनगर),जितेंद्र रविंद्र क्षेत्रे (रा.बालीकाश्रम रोड सुडकेमळा अहमदनगर) यांनी केला आहे. त्यावरुन एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोहेकॉ सांगळे, पोहेकॉ खेंगट, पोना आंधळे, पोकों किशोर जाधव, पोकॉ हरदास यांनी सावेडी परीसरात सदर आरोपीचा शोध घेऊन त्यांना शिताफिने पकडले आहे. त्यांना त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांची नावे सांगितले. पोलिस खाक्या दाखविताच आरोपींनी गुन्हा केल्याचे कबुल केले. त्यांच्याकडून गुन्हयात चोरी गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आरोपी हे सराईत गुन्हेगार असून आरोपी आकाश गोकुळ चव्हाण याच्यावर कोतवाली पोलीस ठाण्यात गु रजि नं. १२३१/२०१९ भादवि कलम ३५३,३४१,५०४ प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.