कोतवाली पोलिसांनी चोरलेल्या दोन रिक्षांसह आरोपीच्या मुसक्या आवळल्या! ४ लाख ५० हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी केला हस्तगत!

अहमदनगर दि.२३ जुलै ( प्रतिनिधी)कोतवाली पोलिसांनी पुण्यातून चोरलेल्या दोन रिक्षांसह आरोपीच्या मुसक्या आवळल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून मिळाली आहे. या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी ४ लाख ५० हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
या घटनेची विस्तृत माहिती अशी की,
दि.२३ जुलै २०२२ रोजी सकाळी ८ वा.सुमारास कोतवाली पोनि/संपतराव शिंदे यांना माहिती मिळाली की, अहमदनगर शहरातील नालेगाव अमरधाम मागील बाजुस येथे एकजण दोन चोरीच्या रिक्षा विक्री करण्याकरीता घेऊन आलेला आहे.आता गेल्यास तो रिक्षासह मिळून येईल,अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने कोतवाली पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार, पंच यांना समक्ष बोलावून घेऊन माहिती देवून बातमीतील ठिकाणी जावून गुन्हेशोध पथकाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्या आरोपीस व रिक्षा ताब्यात घेतल्या आहे. सदरील ठिकाणी सोन्या ऊर्फ सुरज शिवाजी शिंदे (वय २८ रा. बुरूडगावरोड अहमदनगर) हा दोन रिक्षासह मिळून आला त्याला रिक्षाचे कागदपत्रां विषयी विचारणा केली असता,त्याने उडवाउडवीचे उत्तरे दिल्याने रिक्षावर असलेले क्रमांक खोटे असल्याबाबत पोलिसांना खात्री झाल्याने रिक्षाचे चेसी नंबर व इंजिन नंबर यांवरुन माहीती काढून एमआयडीसी भोसरी पोलीस ठाणे,पिंपरी चिंचवड पुणे व चिखली पोलीस ठाणे येथे संपर्क करून खात्री केली असता याबाबत चिखली पोलिस ठाण्यात गुरन ३१७ / २०२२ भादवि ३७९ व एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात गुरन ३८६ / २०२२ भादवि ३७९ प्रमाणे दाखल असून रिक्षा चोरीच्या असल्याबाबत निष्पन्न झाले. याबाबत संबंधित पोलीसांना माहीती देऊन त्याला व रिक्षा जप्त करुन पुढील तजवीज कामी पुणे पोलीसांचे ताब्यात देण्यात आलेले आहे.
जवळपास या दोन रिक्षांची किंमत ४ लाख ५० हजार रु.आहे.सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील,अपर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल,नगर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलिस ठाण्याचे पोनिसंपतराव शिंदे यांच्या सूचनेनुसार पोहेकॉ/शरद गायकवाड,पोना/योगेश भिंगारदिवे,पोकाॅ/दिपक रोहकले,पोकाॅ/अमोल गाडे, पोकाॅ/सुजय हिवाळे,पोकाॅ/सोमनाथ राउत,पोकाॅ/तान्हाजी पवार,पोकाॅ/हेमंत थोरात,पोकाॅ/अभय कदम,पोकाॅ/अतुल काजळे,चापोहेकॉ/सतीष भांड व पोकाॅ/प्रशांत बोरुडे आदिंच्या पथकाने केली आहे.