जन आधार सामाजिक संघटनेची महिला जिल्हा कार्यकारणी जाहीर!महिला जिल्हा अध्यक्षपदी गौतमी भिंगारदिवे यांची निवड! महिलांच्या पुढाकाराने समाजात परिवर्तन घडणार – प्रकाश पोटे

अहमदनगर (प्रतिनिधी)- जन आधार सामाजिक संघटनेची महिला जिल्हा कार्यकारणी,जन आधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे यांच्या उपस्थिती मध्ये जाहीर करण्यात आली. नुकतीच जन आधार सामाजिक संघटनेची महिलांची नूतन कार्यकारिणी खालील प्रमाणे महिला जिल्हा अध्यक्षपदी गौतमी भिंगारदिवे, शहराध्यक्षपदी रोहिणी पवार, महिला प्रदेशाध्यक्ष मंगलताई मोरे, महाराष्ट्र राज्य प्रवक्ता विद्याताई तनवर, जिल्हा उपाध्यक्ष मंगल पालवे, जिल्हा सचिव मंगल साळवे, जिल्हा संघटक रेखा डोळस, जिल्हा संपर्कप्रमुख हिरा भिंगारदिवे, अहमदनगर शहर सचिव रंजना भिंगारदिवे, शहर संपर्कप्रमुख सुनिता भिंगारदिवे, शहर सरचिटणीस लता बर्डे यांची निवड जाहीर करण्यात आली. यावेळी त्यांना निवडीचे पत्र देताना जन आधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे समवेत शहराध्यक्ष शहानवाज शेख, दीपक गुगळे, अमित गांधी, विजय मिसाळ आदी पदाधिकारी उपस्थित होते. जन आधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे म्हणाले की महिलांच्या पुढाकाराने समाजात परिवर्तन घडणार व सामान्य जनतेचे सामाजिक, शैक्षणीक, आरोग्यविषय तसेच केंद्र आणि राज्य शासनाच्या कल्याणकारी योजनांचे हक्क जन आधार सामाजिक संघटनेच्या माध्यमातुन मिळवून देणार यासाठी कार्यक्षेत्रातील प्रत्येक गांव, वाडी-वस्त्यामध्ये जन आधार सामाजिक संघटनेची शाखा स्थापन करून संघटना बांधणीचे कार्य जोमात सुरू केले तसेच जात, धर्म, पंथ विरहीत सामाजिक कार्य करून राज्याच्या व देशाच्या प्रगतीसाठी समाजाच्या जागृतीचे कार्य करीत या कार्याने प्रेरित होऊन मोठ्या संख्येने महिला युवती व युवक संघटनेशी जोडले जात असल्याचे त्यांनी सांगितले तसेच महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सामाजिक कार्य करण्यास बळ देण्यात येणार आहे. व वंचित घटकातील समाजाच्या न्याय हक्कासाठी महिलांनी प्रयत्नशील रहावे तसेच राजकारण करताना समाजाच्या विकासासाठी जन आधार सामाजिक संघटना कटिबद्ध आहे. तसेच महिलांनी संघटनेमध्ये विविध पदाच्या माध्यमातून कार्य करण्याची संधी देण्यात आली असुन नूतन पद अधिकाऱ्यांचे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे यांनी स्वागत करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.