दादासाहेब रूपवतेंचे कार्य दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक:आमदार संग्राम जगताप

अहमदनगर दि.२२ जुलै (प्रतिनिधी) दादासाहेब रूपवते विद्यालय व ज्युनिअर कॉलेज यांच्या वतीने संस्थेचे संस्थापक स्मृतीशेष दादासाहेब रूपवते यांचा २२ वा स्मृतीदिन नुकताच साजरा करण्यात आला.यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना आमदार संग्राम जगताप म्हणाले की,दादासाहेब रूपवते यांचे उपेक्षित समाजासाठी केलेले सामाजिक ,शैक्षणिक कार्य आमच्या पिढीला दीपस्तंभा प्रमाणे मार्गदर्शक आहे व राहील.कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे रजिस्ट्रार प्रा. व्ही.एम. बैचे सर होते.यावेळी ज्येष्ठ नेते अशोक गायकवाड,विजय भांबळ माजी नगरसेवक अनिल शेकटकर, माजी नगरसेवक अजय साळवे,सुरेशभाऊ बनसोडे,आदींनी आपले मनोगत व्यक्त करत दादासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला..कार्यक्रमास नगरसेवक राहुल कांबळे, समदखान, डॉ. आनिल आठरे, प्रा.भीमराव पगारे,बापू विधाते,चंद्रकांत भिंगारदिवे,नितीन कसबेकर, व मोठ्या संख्येने विद्यार्थी हजर होते .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा प्राचार्या सुनीताताई गुंजाळ यांनी केले.तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.जयंत गायकवाड व प्रा.सुनील वागमारे यांनी केले .आभार प्रदर्शन प्रा.राहुल खंडीझोड यांनी केले.