भिंगार काँग्रेस शहराध्यक्षपदी सागर चाबुकस्वारांची निवड! जुन्या कार्यकारिणीसह सर्व आघाड्या, सेल बरखास्त, पुन्हा नव्याने होणार नियुक्त्या

अहमदनगर दि.१९ जुलै (प्रतिनिधी)
भिंगार शहर ब्लॉक काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी सागर दत्तात्रय चाबुकस्वार यांची बिनविरोध निवड झाली आहे. माजी महसूल मंत्री तथा विधिमंडळ काँग्रेस पक्षनेते आ. बाळासाहेब थोरात यांच्या मान्यतेने आणि शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या शिफारशीने ही निवड करण्यात आली आहे. चाबुकस्वार यांच्या रूपाने भिंगार काँग्रेसला अनेक वर्षानंतर युवा चेहरा मिळाला आहे.
🥅 *भाकरी फिरवणार…
नवीन शहराध्यक्षांच्या नावाच्या घोषणे बरोबरच यापूर्वीची जुनी कार्यकारणी तसेच महिला, युवक, विद्यार्थी, सेवादल यासह सर्व आघाड्या, सेल, फ्रंटल बारखास्त करण्यात आले आहेत. नवनिर्वाचित अध्यक्ष यासाठीची निवड प्रक्रिया लवकरच राबवतील. या निमित्ताने जुन्यांचा मेळ घालत असताना अनेक नवीन चेहऱ्यांना कार्यकारिणीत स्थान देत संघटनात्मक पातळीवर भाकरी फिरवली जाणार आहे. आगामी काळातील निवडणुकांसाठी आ. बाळासाहेब थोरात, शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या मार्गदर्शनाखाली भिंगारमध्ये जोरदार संघटनात्मक बांधणी पक्षाच्या वतीने करण्यात येणार असल्याचे शहर जिल्हा सचिव गणेश आपरे यांनी म्हटले आहे.
🏌🏻♂️ *पुनश्च: हरी ओम
भिंगार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ॲड. आर. आर. पिल्ले यांचे कोरोना काळात निधन झाल्यानंतर भिंगार शहराध्यक्ष पद रिक्त होते. स्व. पिल्ले यांनी अनेक वर्ष भिंगार काँग्रेसचे नेतृत्व यशस्वीरित्या केले होते. भिंगारमध्ये काँग्रेसला मानणारा मोठा मतदार वर्ग आहे. मनपा क्षेत्रात जरी समावेश नसला तरी देखील शहर विधानसभा मतदारसंघांमध्ये भिंगारचा समावेश होतो. त्यामुळे राजकीयदृष्ट्या भिंगार महत्त्वाचे मानले जाते. आता काँग्रेसने संघटनात्मक पातळीवर तरूण शहराध्यक्ष देत नव्याने संघटनात्मक बांधणीचा पुनश्च: हरी ओम केला आहे.
👁️ चाबुकस्वार हे पूर्वी भारिप बहुजन महासंघाचे भिंगार शहराध्यक्ष होते. त्यांनी गतवर्षी किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत आ.बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष आ.नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. काळे यांनी आ.थोरात यांच्या माध्यमातून चाबुकस्वार यांना दिलेल्या संधीचे ते कसं सोनं करतात हे आगामी काळात पाहायला मिळणार आहे.
🗣️ *चाबुकस्वार काय म्हणाले
निवडीनंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना चाबुकस्वार म्हणाले की, काँग्रेस नेते आ.बाळासाहेब थोरात, जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली भिंगारमध्ये पक्ष संघटन मजबूत करण्याचे काम सर्वांना सोबत घेत करणार आहे. माझ्यावर आ.थोरात, काळे यांनी दाखविलेल्या विश्वासाबद्दल मी आभारी आहे.
🤗 *यांनी केले अभिनंदन*
निवडीबद्दल चाबुकस्वार यांचे आ.डॉ. सुधीर तांबे, युवक काँग्रेस माजी प्रदेशाध्यक्ष सत्यजितदादा तांबे, प्रदेश काँग्रेस प्रतिनिधी जयश्रीताई थोरात, आ. लहू कानडे, संघटनात्मक जिल्हा निवडणूक अधिकारी प्रा. ललितकुमार झा, भिंगार निवडणूक निर्णय अधिकारी ज्ञानेश्वर काळे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रताप शेळके पाटील, ग्रामीण जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंखे, प्रदेश सचिव सचिन गुंजाळ, ग्रामीण जिल्हा कार्याध्यक्ष तथा शिर्डी संस्थान विश्वस्त सचिन गुजर, प्रदेश प्रवक्त्या उत्कर्षा रुपवते, ज्येष्ठ नेते राजेंद्रदादा नागवडे, नगर शहर ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, आदींनी अभिनंदन केले आहे.