प्रशासकिय
डॉ.पंकज जावळे अहमदनगर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी!

अहमदनगर दि.१३ जुलै (प्रतिनिधी):-अहमदनगर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी डॉ.पंकज जावळे यांची नियुक्ती झाली आहे. तसेच सध्याचे आयुक्त शंकर गोरे यांची मुंबई येथे बदली झाली आहे. डॉ.पंकज जावळे यांनी अहमदनगर मध्ये या आधी उपायुक्त म्हणून महानगरपालिकेचा कारभार अतिशय चांगल्या रितीने पाहिला होता.