आज शिवसेना संकटात असण्याचं एकमेव कारण शिवसेनाच – खा सुजय विखे

कर्जत( प्रतिनिधी ): दि २९
शिवसेना संकटात असण्याचं एकमेव कारण शिवसेनाच आहे. आपण एकमेव आहोत मागील दोन-अडीच वर्षांपासून सांगत आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार साहेब शिवसेना संपविण्याचे काम करीत आहे. मात्र तरी देखील पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना ते समजत नाही हे विशेष आहे असा घणाघात खा सुजय विखे यांनी कर्जत येथे केला. ते बुधवारी कर्जत तालुका दौऱ्यावर होते.
यावेळी पुढे बोलताना खा सुजय विखे यांनी राज्यातील राजकारण आणि आजमितीस असणाऱ्या शिवसेना पक्षाच्या परिस्थितीवर जोरदार टीकास्त्र सोडले. आज शिवसेना पक्ष जो संकटात आहे त्याचे एकमेव कारण शिवसेनाच आहे. ज्यांनी स्वताचे रक्त सांडत, कौटुंबिक त्याग, निष्ठा पणास लावत शिवसेना उभी केली आहे. तीच शिवसेना राष्ट्रवादी बरोबर गेल्याने त्याचे खच्चीकरण झाले असून शिवसैनिक हतबल झाले आहेत. उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगला सोडला. आपल्या हक्काची ५२ आमदार सोडले. पण ते अजून ही पवार साहेबांना सोडायला तयार नाहीत. त्यांनी राष्ट्रवादीचा नाद सोडावा आणि आपले आमदार म्हणत आहे याचा विचार करावा असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केले. सध्याचे महाविकास आघाडीचे सरकार अल्पमतात असल्याने सक्षम विरोधीपक्ष म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात स्थिर सरकार असावे यासाठी भाजपाच्यावतीने बहुमत चाचणीची मागणी केली आहे. वास्तविक पाहता महाराष्ट्र राज्याच्या जनतेने भाजपा-शिवसेनेला सत्तेसाठी कौल दिला होता. मात्र शिवसेनेने भाजपाशी गद्दारी केली. म्हणून जनतेने दिलेला सत्तेचा कौल राष्ट्रवादीने स्वताच्या स्वार्थासाठी अशी आघाडी केली ज्यात जनतेचे हित नव्हते फक्त आणि फक्त स्वताच्या स्वार्थाचेच हित होते असा आरोप ठाकरे सरकारवर केला. न्यायालयाचा निर्णय येईल तो सर्वाना मान्य असेल पण जनतेने दिलेल्या कौलाचे भाजपा सरकार येईल असा विश्वास खा सुजय विखे व्यक्त केला. सत्ता मिळो अथवा ना मिळो. आपला संघर्ष सुरूच असेल मागील अडीच वर्षांपासून कर्जतच्या शेतकऱ्यांना कुकडीचे आवर्तन वेळेत मिळत नव्हते. आता राम शिंदेंना पुन्हा आमदार होण्याची संधी मिळाली आहे. ते निश्चित शेतकऱ्यांच्या कुकडी आवर्तनासाठी प्रयत्नशील असल्याचे विखे यांनी म्हंटले.
यावेळी मृत्युंजय ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष दीपक शहाणे, उमेश जेवरे, अनिल गदादे, दादा सोनमाळी, गजानन चावरे, प्रशांत शिंदे, रविकिरण कानडे, दिग्विजय देशमुख यासह भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.