श्रीरामपूर पोलिसांनी केली मोठी कारवाई गावठी कट्ट्यासह व २ जिवंत काडतूस जवळ बाळगणाऱ्यास केले गजाआड!

श्रीरामपूर दि.२८ जून ( प्रतिनिधी) जिल्ह्यातील श्रीरामपूर पोलिसांनी केली मोठी कारवाई करत
– गावठी कट्ट्यासह व २ जिवंत काडतूस जवळ बाळगणाऱ्यास केले गजाआड केल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून मिळाली आहे. याबाबतची सविस्तर माहिती अशी की,
दि.२७/०६/२०२२ रोजी ३.३५ वाजण्याच्या सुमारास श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनचे निरीक्षक श्री.मच्छिंद्र खाडे यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहीती मिळाली की इसम नामे प्रशांत उर्फ बंडू साईनाथ लेकुरवाळे रा.खैरी,निमगाव ता.श्रीरामपूर हा गावठी कट्टा बाळगतो, तसेच तो खैरी निमगाव ते चितळी जाणाऱ्या रोडवर साई समर्थ मंगल कार्यालय जवळ आहे अशी माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक मच्छिंद्र खाडे व पोसई/अतुल बोरसे,पोना/शेंगाळे,पोकॉ/सुनिल दिघे व चापोकॉ/चांदभाई पठाण अशांनी मिळून बातमीतील ठिकाणी दि.२७/०६/२०२२, ३.५० वा जाऊन निमगाव खैरी तालुका श्रीरामपूर येथील शिवारातील खैरी निमगाव ते चितळी जाणार रोडवर साई समर्थ मंगल कार्यालय जवळ एक इसम उभा दिसला व तो पोलिस पथकाला पाहून पळू लागला त्यावेळी पोलीस पथकाने त्याला झडप घालून पकडले, त्याच वेळी त्याला त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव प्रशांत उर्फ पांडू साईनाथ लेकुरवाळे राहणार खैरी निमगाव तालुका श्रीरामपूर असे सांगितले त्याची अंगझडती घेतली असता तेव्हा त्याच्याकडे एक गावठी कट्टा सुमारे २०,०००/रू. किमतीचा व २ जिवंत काडतूस १००० रू.किंमतीचे असा मुद्देमाल मिळून आला.सदरचा मुद्देमाल हा पंचांसमक्ष जप्त करण्यात आला,सदर घटनेवरून प्रशांत उर्फ पांडू साईनाथ लेकुरवाळे याच्या विरुद्ध श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर २१०/२०२२ भारतीय दंड कायदा कलम ३,२५,७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.सदरील आरोपी हा सराईत असून त्याच्या विरुद्ध सात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत. सदरची कारवाई श्री.मनोज पाटील पोलीस अधीक्षक अहमदनगर,स्वाती भोर मॅडम अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर,विभागीय पोलीस अधिकारी श्री.संदीप मिटके, यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री.मच्छिंद्र खाडे,पोसई/अतुल बोरसे,पोना/अनिल शेंगाळे,पोकॉ/सुनिल दिघे,चापोकॉ/चांदभाई पठाण यांनी केली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोसई/अतुल बोरसे हे करत आहे.