जागरूक नागरिक मंचच्या हरित केडगाव मोहिमेस सुरुवात अध्यक्ष विशाल पाचारणे यांचा वाढदिवस साधेपणाने सामाजिक उपक्रमाने साजरा

केडगाव दि.८ जून (प्रतिनिधी)
केडगाव जागरुक नागरिक मंचची वृक्षारोपणाची हरित केडगाव मोहीम वर्षे ४थे दिनांक 7 जून रोजी मंचचे अध्यक्ष विशाल पाचारणे यांच्या वाढदिवशीदिनी सुरू झाली. सावली सोसायटी भूषण नगर भागात वृक्षसंरक्षक जाळ्या लावून मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करण्यात आली. पर्यावरण समितीचे अध्यक्ष प्रकाश बिडकर यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून सावली सोसायटीत शिकणाऱ्या मूलांना स्पर्धा परीक्षेची पूस्तके उपलब्ध करून दिली. पर्यावरण समिती उपाध्यक्ष उस्मान गनी मनियार यांनी सदर मोहीम जानेवारीतील मकर संक्रांत या सणा पर्यंत दर रविवारी केडगाव भागात विविध पर्यावरण स्नेही वृक्ष लागवड करून त्याचे संगोपन करून करण्यात येणार आहे अशी माहिती दिली. आरोग्य समितीचे अध्यक्ष डॉ. सुभाष बागले यांनी वाढदिवशीदिनी या स्तुत्य उपक्रमाबद्दल विशाल पाचारणे यांना शुभेच्छा दिल्या. नगरसेवक अमोल येवले यांनी या उपक्रमात लोकांनी भरभरून सहभाग घेऊन आपल्या आजूबाजूचा परिसर हरित करून पर्यावरणाची काळजी घ्यावी असे आवाहन नागरिकांना केले. सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल कोतकर यांनी मंचच्या विविध उपक्रमांचे कौतुक केले असेच उपक्रम सदैव चालू ठेवावेत असे आवाहन केले . सदर कार्यक्रमाचे नियोजन मंचचे खजिनदार प्रवीण पाटसकर , सद्दाम शेख, नवनाथ बांबेरे, दिलीप ससे, गणेश पवार , किशोर जाधव , आकाश घावते यांनी केले.