राजकिय

संतश्रेष्ठ सद्गुरू गोदड महाराज यांच्या भक्तनिवासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर; आ. रोहित पवारांनी दिलेला शब्द पाळला

कर्जत (प्रतिनिधी) : दि ६ जून
संतश्री सद्गुरू गोदड महाराजांच्या भक्तनिवासासाठी आमदार रोहित पवार यांनी नगर विकास विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. अखेर आमदार रोहित पवार यांच्या यशस्वी पाठपुराव्याने व प्रयत्नातून शासनातर्फे कर्जत नगरपंचायत क्षेत्रातील संतश्री गोदड महाराज भक्त निवासासाठी ५ कोटींचा भरघोस निधी शासनाकडून मंजूर करण्यात आला आहे. बाहेर गावावरून येणारे भक्तजन, महंत व धार्मिक गुरू यांना राहण्याची व्यवस्था त्यासोबतच गरजू लोकांसाठी छोटेखानी विवाह समारंभ करण्याची व्यवस्था तसेच जेवण बनवण्याची व जेवण करण्यासाठीची व्यवस्था या भक्तनिवासाच्या इमारतीत असणार आहे. संतश्री सद्गुरू गोदड महाराज यांच्या प्राचीन ग्रंथाचं संग्रहालय होण्यासाठी देखील त्या इमारतीत जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी या भक्त निवासासाठीचा प्रस्ताव नगरविकास विभागाकडे दिला होता व वेळोवेळी यासंबंधी आवश्यक तो पाठपुरावा शासन स्तरावर केला होता. आमदारकीच्या निवडणुकीवेळी तसेच कर्जत नगरपंचायत निवडणुकीवेळी आमदार रोहित पवार यांनी जनतेला भक्तनिवासाची इमारत उभारली जाईल, असा शब्द दिला होता. आता या भक्त निवासासाठी कोट्यवधींचा निधी मंजूर करून आणल्याने आमदार रोहित पवार यांनी दिलेला शब्द पाळला असल्याचं या माध्यमातून दिसून येत आहे. दरम्यान, नगर विकास विभागातर्फे मंजूर करण्यात आलेल्या कामात भक्त निवासासह संतश्री गोदड महाराज मंदिर परिसराचा विकास करणे, सुशोभीकरण करणे, पिण्याच्या पाण्याची सोय करणे, दिवाबत्तीची सोय करणे व तात्पुरती बैठक व्यवस्था करणे यासोबतच सत्संग हॉलची उभारणी करणे इ. कामांचा समावेश आहे.

*###***###

स्वच्छ मनाने व चांगल्या विचाराने जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचा पाठपुरावा करतो तेव्हा त्याला यश नक्कीच येतं. संत श्री गोदड महाराजांचं कार्य हे खूप मोठं होतं, त्यांचे विचार आपण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचवणार आहोत. त्यानंतर विविध भागातील अनेक लोक व अध्यात्मिक क्षेत्रातील येणारे मान्यवर यांना चांगली व्यवस्था मिळावी व या सर्व लोकांची उत्तम सोय कर्जत शहरात व्हावी, या उद्देशाने आपण या भक्तनिवासाची उभारणी करत आहोत. – आ रोहित पवार

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे