समाज घडवण्यात शिक्षकांची भूमिका महत्वाची – उद्धव शिंदे स्नेहबंध तर्फे छावनी परिषद शिक्षकांचा सत्कार

अहमदनगर (प्रतिनिधी) : शिक्षक हा भावी पिढीचा शिल्पकार आहे. त्याला ख-या अर्थाने त्याच्या कलेप्रमाणे काम करू दिले तर संस्कारशील विद्यार्थ्यांची घडवणूक शिक्षकाच्या हातून निश्चित झाल्याशिवाय राहणार नाही, म्हणून भावी पिढीच्या जडणघडणीत शिक्षकांचा निश्चित मोठा वाटा असल्याचे प्रतिपादन स्नेहबंधचे अध्यक्ष उद्धव शिंदे यांनी भिंगार येथील छावणी परिषद शाळेमधील शिक्षकांच्या सत्कार कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना केले.
यावेळी छावणी परिषद शाळेचे मुख्याध्यापक संजय शिंदे व राजेंद्र भोसले, मुबीना सय्यद, महेश भगत, अरविंद कुडिया, उज्वला पाटकुलकर आदींसह सर्व शिक्षक उपस्थित होते.
यावेळी मुख्याध्यापक संजय शिंदे यांनी स्नेहबंधच्या माध्यमातून जे विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात त्यांची माहिती दिली. महेश भगत यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.
शिक्षकदिनानिमित्ताने स्नेहबंध फौंडेशनच्या वतीने विद्यालयातील सर्व शिक्षकांना गुलाबपुष्प भेट देऊन सत्कार करण्यात आला.