ब्रेकिंग

जामखेड हा सदिच्छाचा बालेकिल्ला आहे.ही ओळख या निवणुकीत ही कायम राहणार! बाळासाहेब मोरे

जामखेड (प्रतिनिधी)शिक्षक बँक व सदिच्छा मंडळाचे पंचवार्षिक निवडणूक 16 ऑक्टोबर 2022 रोजी होऊ घातली आहे. या निमित्ताने जामखेड तालुक्यातील सदिच्छा व आघाडीचे बँकेचे उमेदवार श्री मल्हारी पारखे सर व विकास मंडळाचे उमेदवार श्री अशोक राऊत सर यांच्या प्रचारासाठी आज जामखेड शहर व परिसरातील सभासदांच्या वैयक्तिक कौटुंबिक गाठीभेटी घेऊन झंजावती असा प्रचार दौरा आज संपन्न झाला.सदिच्छा मंडळ हे सर्व मंडळाचे मातृ मंडळ असून जामखेड तालुका हा सदिच्छा मंडळाचा बालेकिल्ला राहिलेला आहे तीच ओळख याही निवडणुकीत कायम राहील असा विश्वास आजच्या भेटीत सभासदांनी दिला. असे जामखेड प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष बाळासाहेब मोरे सर यांनी ठणकावून सांगितले.

जामखेड मध्ये 441 सभासद आहेत. या असलेल्या मतदानापैकी सदिच्छा मंडळ व आघाडीच्या उमेदवाराला इतर मंडळापेक्षा जास्त मते मिळतील असे चित्र आजच्या प्रचार दौऱ्यात पाहायला मिळाले.

गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये सदिच्छा मंडळातून स्वतःच्या महत्त्वाकांक्षा मुळे फुटून नवीन गुरुमाऊली मंडळाची निर्मिती ज्या नेत्यांनी केली, त्याचे बरोबर दोन-तीन भाग झालेले आपणास या निवडणुकीत पाहायला मिळतात.

याही निवडणुकीत त्यांचे अजून जास्त तुकडे महत्त्वकांक्षा पायी होतील.तसेच सत्ताधारी गुरुमाऊली मंडळांनी कोरोना काळात सुद्धा सगळीकडे निर्बंध असताना यांनी मात्र कुठून कसा प्रवास केला काय माहित नाही परंतु लाखो रुपयांचा प्रवास भत्ता मात्र हडप केला. तसेच घड्याळ घोटाळा सुद्धा पोरबंदरला जाऊन केला.आणि प्रचंड माया मंडळाच्या नेत्यांनी व संचालकांनी जमविली.

या निवडणुकीत आम्ही संचालक प्रवास भत्ता, विनाकारण फर्निचर दुरुस्ती, घड्याळ घोटाळा असेल या सर्व घोटाळ्यांचा पर्दाफाश करून गुरुमाऊली मंडळाच्या नेत्यांना व संचालकांना उघडे केल्याशिवाय राहणार नाहीत, असाच दमच प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष श्री बाळासाहेब मोरे यांनी सत्ताधाऱ्यांना भरला.

सदिच्छा मंडळ व आघाडी या मंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे उमेदवार व मंडळाचे कार्यकर्ते हे स्व इच्छेने व स्व खर्चाने प्रचारात सहभागी असून , हे महिलांसह वैयक्तिक आणि कौटुंबिक गाठीभेटी घेऊन मंडळाच्या धोरणांचा प्रचार करत आहेत. यातच या आघाडीचे यश सामावलेले आहे.
हीच आमच्या मंडळाची जमेची बाजू असून याच्याच बळावर आम्ही जामखेड तालुक्यातील इतर मंडळापेक्षा आमच्या मंडळाच्या दोन्ही उमेदवारांना निश्चित जास्त मतदान घेऊन सदिच्छा जामखेड हा बालेकिल्ला आहे हे पुन्हा एकदा ह्या निवडणुकीतून दाखवून देऊ असे श्री बाळासाहेब मोरे सर यांनी बोलताना सांगितले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे