
*अहमदनगर, २ जून (प्रतिनिधी)- सहा आठवड्यांपेक्षा जास्त काळापासून प्रलंबित असलेल्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी १५ जून २०२२ रोजी अहमदनगर येथे विभगीय डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती अहमदनगर डाक विभागाचे वरिष्ठ अधीक्षक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
डाक अदालतमध्ये अनुत्तरीत तक्रारींबाबत अर्ज, त्यासोबत मूळ तक्रारीची प्रत, ज्या अधिकाऱ्यांकडे दाखल केली त्यांचा हुद्दा व दाखल केल्याची तारीख, एका अर्जासोबत एकच तक्रार असावी, तक्रार १० जून २०२२ पर्यंत अथवा तत्पूर्वी मिळेल अशा तऱ्हेने दोन प्रतींत एस. रामकृष्णा, वरिष्ठ अधीक्षक डाकघर, अहमदनगर विभाग, अहमदनगर ४१४००१ या पत्त्यावर पाठवावी. त्यानंतर आलेल्या तक्रारींचा डाक अदालतमध्ये समावेश केला जाणार नाही.
विभागीय डाक अदालत अहमदनगर येथे १५ जून २०२२ रोजी सकाळी ११ वाजता, वरिष्ठ अधीक्षक डाकघर, अहमदनगर विभाग, स्टेट बँक चौक, अहमदनगर येथे आयोजित करण्यात आली आहे. त्यामध्ये सदर व्यक्तीने स्वखर्चाने यावे लागेल त्यासाठी कुठलाही भत्ता दिला जाणार नाही.असे ही प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.