करणी सेनेचे अध्यक्ष अजय सेंगरवर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल! पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने अजय सेंगर यांच्यावर कडक कारवाई करण्याचे केली मागणी!

अहमदनगर दि.३० डिसेंबर (प्रतिनिधी) : एक जानेवारी रोजी शौर्यदिन साजरा केला जातो. विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून आणि देशभरातून लाखो लोक येतात 2018 मध्ये शौर्य दिनाच्या कार्यक्रमाला अनेक कारणांमुळे धक्का बसला त्यानंतरचे शौर्य दिवस शांततेत गेले पण यावर्षी पुन्हा एकदा विजयस्तंभ वादाच्या भौऱ्यात सापडले आहे. राज्य सरकारने विजयस्तंभ बुलडोजर लावून पाडून टाकावा. असे वादग्रस्त वक्तव्य महाराष्ट्र करणी सेनेचे अध्यक्ष अजय सेंगर यांनी केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला आहे.
सेंगर यांच्या विधानाला आरपीआय खरात गटाने कडाडून विरोध केला होता. हा करणे सेनेचे अजय सिंगर यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी अहमदनगर मध्ये पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने महाराष्ट्रात सगळ्यात आधी अहमदनगर मध्ये तोफखाना पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुमित गायकवाड, प्रदेश संघटक सोमा शिंदे, सिद्धांत गायकवाड, अक्षय बोरुडे, दीपक सोनवणे, गणेश गायकवाड, संघा गायकवाड, धम्मा गायकवाड, किरण जाधव महेश भोसले, गौतमी भिंगारदिवे, विशाल गायकवाड, नितीन कसबेकर,सामजिक कार्यकर्ते सुरेश भिंगारदिवे,हिराबाई ,भिंगारदिवे,रंजना भिंगारदिवे, सुनीता भिंगारदिवे आदी उपस्थित होते. करणी सेनेच्या या मागणीनंतर पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने विरोध केला जातोय. करणी सेनेचे अजय सेंगर यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक करून कारवाई करावी अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली जात आहे.