सामाजिक

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वादिनी यंदाही माणुसकी प्रती करूया रक्तदान उपक्रमाचे आयोजन महापरिनिर्वाणदिनी रक्तदान शिबिराचे सलग सहाव्या वर्षी आयोजन

पुणे – भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 66 व्या महापरिनिर्वाणदिनी यंदाही सलग सहाव्या वर्षी माणुसकी प्रति करूया रक्तदान! या उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष तथा मुख्य संयोजक उमेश चव्हाण यांनी सांगितले.
सध्या पुण्यात डेंग्यू, गोवर, मलेरिया, टायफाईडची साथ सुरु आहे. शरीरात रक्त कमी होणे, रक्तातील प्लेटलेट कमी होणे यामुळे बऱ्याच रुग्णांना पुरेसा रक्तपुरवठा मिळवताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पुण्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झालेला असताना महापरिनिर्वाणदिनी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन रुग्ण हक्क परिषदेने केले आहे.
याबाबत बोलताना उमेश चव्हाण म्हणाले की, जातीयता – धार्मिक तेढ संपविण्याचा, जातीप्रथा नष्ट करण्याचा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा मुख्य उद्देश या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून कृती कार्यक्रमाद्वारे सिद्ध करण्याचे काम आम्ही करतो. सर्व जातीय धर्मीय रुग्णांना रक्ताचा तुटवडा पडू नये, यासाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणात महापरिनिर्वाण दिन रक्तदान केले जाते. मानवी रक्ताला कुठलीही जात नसते. सर्व नागरिक समान आहेत, हा संदेश महापरिनिर्वाणदिनी समस्त नागरिकांना देण्यासाठी या रक्तदान शिबिराला मोठे महत्त्व आहे.
मंगळवार दि. 6 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 09.00 ते रात्री 10.00 वाजेपर्यंत सलग तेरा तास रक्तदान शिबीर डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा गार्डन, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, पुणे स्टेशन, पुणे – 01येथे रक्तदान शिबिराचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात येणार आहे, तरी सर्व नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर अभिवादन करण्यासाठी उपस्थित राहून रक्तदान करावे, असे आवाहन रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी केले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे