प्रशासकिय
पहारेकरी पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन

पहारेकरी पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन
अहमदनगर दि. १० मे(प्रतिनिधी) – महासैनिक संकुल, अहमदनगर येथे मानधनावर निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात दैनंदिन हजेरीवर अशासकीय पहारेकरी पद भरण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, अहमदनगर यांचे मार्फत अर्ज मागविण्यात येत आहेत.
अर्जदाराचे वय पन्नास वर्षापर्यंत असावे. इच्छुक माजी सैनिक/ इतर नागरिक यांनी २० मे २०२२ पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.