दोन वर्षांपासुन फरार असलेल्या आरोपीच्या भिंगार कॅम्प पोलिसांनी आवळल्या मुसक्या!

अहमदनगर (प्रतिनिधी) दोन वर्षापासून पोटगीच्या वॉरंटमधील फरार असलेला व दोन वर्षापासून मिसींग दाखल असलेल्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात भिंगार कॅम्प पोलीसांना यश आले आहे. याबाबतची सविस्तर हकीगत अशी कीशेख मजहर आयाज (वय ४१, रा. बडी मरीयम मस्जिदजवळ, मुकुंदनगर ता.जि.अहमदनगर) असे पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
दि.२८ डिसेंबर २०१९ रोजी मुलगा शेख मजहर आयाज (वय 41 वर्षे रा. बडी मरीयम मस्जिद जवळ, मुकुंदनगर ता. जि.अहमदनगर) हा राहत्या घरून कोठेतरी निघून गेला आहे, अशी आयाज अहमद शेख (रा. मुकुंदनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोस्टे मनुष्य मिसींग क्र.८६/२०१९ दाखल करण्यात येऊन मिसींगचा तपास पोना.गंगावणे हे करीत होते.तपासादरम्यान मिसिंग इसमाचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी कोर्ट नं.०१ संगमनेर यांनी पोटगी वॉरंट काढले असून सदर इसम हा पोटगी मधील रक्कम चुकवित असून न्यायालयात तारखेला हजर राहत नव्हता. त्याबाबत सखोल माहीती घेतली असता तो अधुनमधून त्याच्या राहते घरी येऊन भेट देऊन जातो अशी माहीती मिळालेली होती.दि.१९ मार्च २०२२ रोजी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी कोर्ट नं.०१ संगमनेर यांनी त्याचा स्टँडींग वॉरंट काढून ते बजावनी कामी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात दिले होते.त्यावर वॉरंट बजावनी करणारे अंमलदार हे त्याचा भिंगार कॅम्प पोलिस ठाणे हद्दीत वेळोवेळी शोध घेत होते. दि.४ मे २०२२ रोजी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याचे सपोनि.शिशिरकुमार देशमुख यांना बातमी मिळाली कि,स्टँडींग वॉरंट मधील पाहीजे असलेला व्यक्ती हा त्याच्या राहते घरी आला आहे,अशी खात्रीलायक माहिती मिळाल्याने सपोनि.देशमुख यांनी वॉरंट बजावनी करणा-यांना त्याला अटक करण्याच्या सूचना दिल्या.पोलीस पथकाने त्यास त्याच्या राहते घरी बडी मरीयम मस्जिद जवळ,मुकुंदनगर ता.जि.अहमदनगर येथे जाऊन ताब्यात घेऊन त्यास पोहेकाँ.जे.एन.आव्हाड, चापोकाॅ.बी.एम.लगड यांनी संगमनेर येथील न्यायालयासमोर समक्ष हजर केले असता त्यास न्यायालायाने २० दिवस कारावासाची शिक्षा सुनावली आहे.त्यास संगमनेर येथील दुय्यम कारागृह येथे जमा केला आहे.तो पोटगीची रक्कम चुकवण्यासाठी व स्वतःची ओळख लपविण्यासाठी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल करून न्यायालयाची दिशाभूल करीत होता.जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील,अपर पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल व नगर शहर उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली भिंगार कॅम्पचे सपोनि.शिशिरकुमार देशमुख यांच्या सूचनेनुसार,पोसई.एम.के.बेंडकोळी, पोहेकाँ.जी.वाय.जठार,पोना.आर.एन.कुलांगे,पोकॉ.आर. के.दरेकर,पोना.एस.जी.शेख,पोकॉ.के.जे.चव्हाण,पोकाँ. एस.बी.सोनवणे इ. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कारवाई केली आहे.