स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई खुनाचा प्रयत्न व सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी दाखल गुन्ह्यातील फरार आरोपीस पोलिसांनी केले गजाआड!

अहमदनगर ( प्रतिनिधी) स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई खुनाचा प्रयत्न व सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी दाखल गुन्ह्यातील फरार आरोपीस पोलिसांनी केले गजाआड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. याबाबतची सविस्तर माहिती अशी की , दि १९/०८/२०१९ रोजी फिर्यादी श्री.संदीप नवनाथराव नेहरकर(वय 25 वर्ष,धंदा नोकरी तलाठी,राहणार राहुरी बुद्रुक तालुका राहुरी)हे कोतवाल बाचकर यांच्यासह नवीन गावठाण,बारगांव नांदूर,ता.राहूरी येथे कार्यालयीन कामकाजाचा मधील चौकशी करणे कामी शासकीय वाहनांमधून जात असताना इसम नामे दिपक आघाव हा हातात फावडे घेऊन गाडीला आडवा आला व म्हणाला तू आम्हाला मुरूम का वाहू देत नाही असे म्हणून हातातील फावड्याने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करू लागला यात फिर्यादी व साक्षीदार यांना जखमी केले.तसेच दीपक आघाव यांचे वडील भानुदास आघाव व भाऊ सागर आघाव यांनी शासकीय वाहनाचा पुढे आडवे येऊन मोठमोठाले दगड गाडीच्या काचेवर मारून जीवे मारण्याचा प्रयत्न करून सरकारी कामात अडथळा निर्माण केला होता सदर या घटनेबाबत राहुरी पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.६६८/२०१९भादविक ३०७,३२७३३२,३५३,३४१,४२७,५०४,५०६,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.परंतु गुन्हा दाखल झाल्यापासून नमूद आरोपी फरार झाले होते.श्री.मनोज पाटील पोलीस अधीक्षक अहमदनगर यांनी जिल्ह्यातील फरार-पाहिजे आरोपींचा शोध घेऊन कारवाई करणे बाबत पोलीस निरीक्षक श्री.अनिल कटके स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांना आदेश दिले होते नमूद आदेशान्वये पोलीस निरीक्षक अनिल कटके स्थानिक गुन्हे शाखा यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना फरार-पाहीजे आरोपी यांचा शोध घेऊन कारवाई करणे बाबत सूचना दिल्या होत्या.सदरील पोलिसांचे पथक राहुरी परिसरामध्ये आरोपींचा शोध घेत असताना पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की आरोपी नामे दिपक आघाव हा राहुरी येथील त्याचे मूळ पत्त्यावर राहात असून तो सध्या हडपसर जिल्हा पुणे येथे आहे,अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पथक बातमीतील नमूद ठिकाणी जाऊन आरोपीचे ठावठिकाणा बाबत माहिती घेऊन आरोपीस शिताफीने ताब्यात घेतले ताब्यात घेतल्यावर त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव दीपक भानुदास आघाव वय २५ वर्ष राहणार बारगाव नांदूर नवीन गावठाण तालुका राहुरी असे सांगितल्याने त्यास ताब्यात घेऊन राहुरी पोलीस स्टेशन येथे हजर केले आहेत.सदरची कारवाई श्री.मनोज पाटील पोलिस अधीक्षक अहमदनगर,श्री.सौरभ कुमार अग्रवाल अप्पर पोलिस अधीक्षक अहमदनगर,श्री.सुदर्शन मुंडे उपविभागीय पोलिस अधिकारी शेवगाव विभाग अहमदनगर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनील कटके,सपोनि/ सोमनाथ दिवटे,सफौ,भाऊसाहेब काळे,पोहेकॉ/मनोहर गोसावी/ सुनील चव्हाण,दत्तात्रय हिंगडे,पोना/ शंकर चौधरी,संतोष लोंढे,रवी सोनटक्के,रोहित येमुल,सागर ससाने,रणजित जाधव व चापोहेकॉ/चंद्रकांत कुसळकर यांनी केली आहे.