शिंदेंसारख्या व्यक्ती संघर्ष करत समाजात निर्माण करताहेत आदर्श : आमदार जगताप
स्नेहबंधचे अध्यक्ष उद्धव शिंदे यांचा मेघळे फोटो डिजिटलतर्फे गौरव

अहमदनगर दि.४ जून( प्रतिनिधी) – आज समाजात सर्वत्र अंधार पसरत असताना स्नेहबंधचे अध्यक्ष उद्धव शिंदे यांच्यासारखी काही मंडळी स्वत:ची पणती घेऊन प्रामाणिकपणे उजेड पसरवण्याचे कार्य करीत आहेत. ही मंडळी समाजातील खरे हिरो आहेत. नकारात्मक वातावरण असताना सुद्धा ही मंडळी सकारात्मक संघर्ष करीत समाजात एक आदर्श निर्माण करीत आहेत, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
स्नेहबंध सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष उद्धव शिंदे यांच्या सामाजिक व सेवाभावी कार्याबद्दल मेघळे फोटो डिजिटलच्या वतीने तुषार मेघळे यांच्या वतीने आमदार जगताप व मच्छिंद्र मेघळे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी तुषार मेघळे, योगेश मेघळे, अमित खामकर, सुनील शिरसुल उपस्थित होते.
शिंदे यांनी समाजाच्या उत्कर्षासाठी अमुल्य योगदान दिले आहे. सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक व सेवाभावी कार्यात त्यांचा हिरीरिने सहभाग असतो. त्यांनी आजवर केलेल्या सेवाभावी कामाचे मुल्यमापन करुन भविष्यात त्यांना अधिक जोमाने कार्य करण्यास प्रेरणा मिळावी, या उद्देशाने त्यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला, असे तुषार मेघळे म्हणाले.