महापालिका जिल्हापरिषद निवडणूकीत पक्षाने दिलेल्या उमेदवारांना निवडून आणण्याची जबाबदारी राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग व कार्यकर्त्यांची: सुरेश भाऊ बनसोडे
राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग उत्तर महाराष्ट्र विभागीय कार्यकारिणीची बैठक नाशिक येथे संपन्न

अहमदनगर दि.९(प्रतिनिधी) राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग उत्तर महाराष्ट्र विभागीय कार्यकारिणीची बैठक नाशिक येथील कार्यालयात नुकतीच पार पडली.सदर बैठकीत नंदूरबार,धुळे,नाशिक,जळगाव,अहमदनगर व मालेगाव चे तालुकाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष व प्रदेश पदाधिकारी यांची उपस्थिती होती.यावेळी कार्यकर्ते व पदाधिकारी यांना राज्याचे प्रदेश अध्यक्ष मा.आ.जयदेव अण्णा गायकवाड,मा.पंडितजी कांबळे,मा.धनंजयजी निकाळे यांनी मार्गदर्शन केले.अहमदनगर शहराच्या वतीने सामाजिक न्याय विभाग शहर जिल्हाध्यक्ष मा.सुरेश भाऊ बनसोडे यांनी आमदारअरुण काका जगताप व आमदार संग्राम भैय्या जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे काम जोरदार सुरू असून येणाऱ्या महानगर पालिका व जिल्हापरिषद निवडणुकीत राष्ट्रवादीच्या जास्तीत जास्त उमेदवारांना पक्षाचे तिकीट उपलब्ध करून देण्याची मागणी सुरेश भाऊ बनसोडे यांनी या बैठकीत केली. तसेच पक्षाच्या उमेदवारी दिलेल्या उमेदवाराला निवडून आणण्याची जबाबदारी सामाजिक न्याय विभाग व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी हे करतील असे सामाजिक न्याय विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष सुरेश भाऊ बनसोडे यांनी आपल्या भाषणात सांगीतले.