अनुसूचित जाती जमाती संसदीय मंचला सक्रिय करणार -केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले
ना.रामदास आठवलेंच्या निवासस्थानी आयोजित स्नेहभोजनाला अनेक मंत्री;खासदार मान्यवरांची ग

नविदिल्ली दि.९ (प्रतिनिधी) – एस सी एस टी पार्लमेंटरी फोरम सध्या कार्यान्वित नसल्यामुळे राज्यसभा आणि लोकसभेतील अनुसूचित जाती जमातीच्या सदस्यांना एकत्र करून एस सी एस टी पार्लमेंटरी फोरमच्या कार्यकारिणीचे पुनर्गठन
करण्याचा तसेच या अनुसूचित जाती जमाती संसदीय मंच च्या अध्यक्षपदी सर्वाधिक ज्येष्ठ सदस्याची नियुक्ती करण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी दिली. ना.रामदास आठवले यांच्या दिल्लीतील 11 सफदर जंग रोड या निवासस्थानी देशभरातील अनुसूचित जाती जमाती च्या खासदारांची बैठक आयोजित करण्यात आली होती.त्या बैठकीत एस सी एस टी संसदीय मंच या निष्पक्ष आणि समाजहिताचा मंच स्थापन करण्याचा निर्णय झाला.केद्रियराज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी देशभरातील सर्व पक्षांच्या अनुसूचित जाती जमातीच्या खासदार लोकप्रतिनिधींसाठी त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी स्नेहभोजनाचे आयोजन केले होते.या स्नेहभोजन आणि बैठकीस अनेक मान्यवरांनी गर्दी केली होती.त्यात केंद्रीय कायदा मंत्री किरण रिजुजू; अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री पशुपती कुमार पारस; संसदीय कार्य आणि संस्कृतीक कार्य राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल; केंद्रीय कायदा राज्यमंत्री सत्यपाल सिंग बघेल; जलशक्ती राज्यमंत्री बिश्वेश्वर तुडु;आदिवासी राज्यमंत्री रेणुका सिंग सरुता; खासदार थेरमावलम; खासदार कांता कदम; खासदार राजेंद्र गावित; खासदार सदाशिव लोखंडे; खासदार अनिल फिरोजिया; खासदार हंसराज हंस; खासदार अशोक नेते; खासदार मोहन मांडावी; दृष्यंत कुमार गौतम; तसेच महाराष्ट्रातून माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत ; आमदार जयकुमार रावळ आदी अनेक मान्यवर यावेळी आवर्जून उपस्थित होते.देशभरातील अनुसूचित जाती जमातीच्या लोकप्रतिनिधींना केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांचे नेतृत्व राष्ट्रीय स्तरावर मार्गदर्शक स्वरूपात पुढे आले असून देशभरातील दलित आदिवासी बहुजनांचे राष्ट्रीय नेतृत्व म्हणून रामदास आठवलेंकडे पाहिले जात असल्याने दिल्लीत ना रामदास आठवले यांची राजकीय शक्ति वाढली असल्याची प्रचिती त्यांनी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाला देशभरातील मान्यवर खासदारांनी लावलेल्या उपस्थितीमुळे आली आहे.