प्रशासकिय

भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त विधान भवन येथे ध्वजारोहण

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क :मुंबई, दिनांक 16ऑगस्ट (वार्ताहर/प्रतिनिधी): विधान भवन, मुंबई येथे आज भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती मा.प्रा.राम शिंदे यांच्या शुभहस्ते, महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उप सभापती मा.डॉ. (श्रीमती) नीलम गोऱ्हे व महाराष्ट्र विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते मा. श्री. अंबादास दानवे याच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले.
याप्रसंगी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव (१) श्री. जितेंद्र भोळे, सचिव (२) श्रीमती मेघना तळेकर, सचिव (३) डॉ. विलास आठवले, सचिव (४) श्री. शिवदर्शन साठ्ये यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विधानमंडळाचे मुख्य सुरक्षा अधिकारी श्री. राजू भुजबळ यांच्या नेतृत्वाखालील पथकाने यावेळी मानवंदना दिली.
या प्रसंगी मा. सभापती यांनी संबोधित करतांना भारताच्या शूर सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. दहशतवाद्यांचे तळ उद्धस्त करीत राबविलेल्या “ऑपरेशन सिंदूर “बद्दल त्यांनी भारतीय सैन्याचे अभिनंदन केले. तसेच भारताला सामर्थ्यशाली आणि वैभवशाली बनविण्याचा आपल्या सर्वांचा संकल्प सिद्धीस जावा अशी मनोकामना व्यक्त करुन भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी महाराष्ट्र विधानमंडळाच्या वैशिष्ट्यपूर्ण वास्तूला करण्यात आलेल्या आकर्षक विद्युत रोषणाईने या वास्तूचे सौंदर्य उजळून निघाले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे