गुन्हेगारी

भिंगार कॅम्प हद्दीत बनावट विदेशी दारूचा साठयावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा आरोपीसह 1,85,000/- रू.किंमतीचा मुद्देमाल जप्त

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर, दि. 3 सप्टेंबर : भिंगार कॅम्प हद्दीत बनावट विदेशी दारूचा साठयावर स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकत
आरोपीसह 1,85,000/- रू.किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले आहे. या बाबतची विस्तृत माहिती अशी की,
मा.श्री मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंदयाची माहिती काढुन कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
नमुद आदेशान्वये श्री.संतोष मुटकुळे, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांनी सपोनि/भोये व पोलीस अंमलदार संदिप पवार, संतोष खैरे, अमृत आढाव, बाळासाहेब खेडकर व सुनिता पवार अशांचे पथक तयार करून अवैध व्यावसायिकांची माहिती काढुन, कारवाई करणेबाबत सुचना व मार्गदर्शन करून पथकास रवाना केले.
दिनांक 03/09/2026 रोजी पथक भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंदयाची माहिती घेत असताना गोपनीय माहिती मिळाली की, इसम  विजय कौशीक, रा.भिंगार, अहिल्यानगर याने बनावट लेबल लावलेली दारू ही आलिशा मंझील, महेशनगर, बाराबाभळी येथे पहिल्या मजल्यवरील खोलीत ठेवलेली आहे.मिळालेल्या माहितीवरून पथकने पंचासमक्ष नमूद ठिकाणी जाऊन खात्री केली असता तेथे विजय बलेश्वरसिंह कौशीक, वय 46, रा.प्लॉट नं.5, विजयनगर, भिंगार, अहिल्यानगर हा मिळून आला.त्याचे घराबाबत विचारपूस केली असता त्याने सदरचे घर भाडयाने घेतले असल्याचे कळविले.पंचासमक्ष घरझडती घेतली असता घरामध्ये LIGHTHOUSE Extra Smooth WHISKY कंपनीची विदेशी दारू मिळून आली.मिळून आलेल्या बॉटलवरील लेबलवर किंमत, बॅच नंबर व उत्पादन तारीख दिसून आली नाही.दारूच्या बॉटलवर बनावट लेबल लावल्याची खात्री पटल्याने विजय बलेश्वरसिंह कौशीक, वय 46, रा.प्लॉट नं.5, विजयनगर, भिंगार, अहिल्यानगर यास ताब्यात घेऊन, त्याचे कब्जातून 1,75,000/- रू किं. LIGHTHOUSE Extra Smooth WHISKY कंपनीच्या 750 मिलीच्या 175 बॉटल, 20,000/- रू किं.एक मोबाईल असा एकुण 1,85,000/- रू किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.ताब्यातील आरोपीकडे जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाबाबत अधिक विचारपूस करता त्याने सदरचा मुद्देमाल त्याचा साथीदार 2) संदिप सानप, रा.मेहकरी, ता.अहिल्यानगर (फरार) याचेकडून घेतला असल्याची माहिती सांगीतली.
ताब्यातील आरोपीविरूध्द भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन गु.र.नं. 457/2026 भारतीय न्याय संहिता कलम 318(4), 336 (3), 340(2), 341(2), 3(5) महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (अ) (ब) (ई)(फ),66, 80, 81, 83, 90, 103 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन करीत आहे.
वरील कारवाई मा.श्री.मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे