सामाजिक

टाकळीमिया येथे शिवस्मारक व डॉ. आंबेडकर ग्रंथालय उभारणी करणार – बाळासाहेब जाधव

पक्षाचा राजीनामा देत सामाजिक सलोख्याचे आवाहन

राहुरी /( प्रतिनिधी) — तालुक्यातील टाकळीमियॉ येथे दि.२ मार्च २०२२ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचे शिवस्मारक उभारणी व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालय उभारणी करीता ग्रामस्थांची विषेश ग्रामसभा घेण्यात आली. या ग्रामसभेमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालय व शिवस्मारक उभारण्यात येण्याबाबत चर्चा करण्यात आली. व ठराव सर्वानुमते मंजुर करण्यात आला. दरम्यान काही विघ्नसंतोषी व्यक्तींनी सदर चर्चेला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न केला मात्र शिवस्मारक व ग्रंथालय उभारणी करणार असून पक्षाचा राजीनामा देत असल्याचे रिपाइंचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब जाधव यांनी सांगितले .टाकळीमिया येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
ग्रामसभेतील चर्चेतून कलह निर्माण झाले. यामध्ये एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात आले. वास्तविक पाहता प्रत्येक व्यक्तीला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. परंतू त्याला एक ठराविक पद्धत आहे एकमेकांची मत जाणून घेणे गरजेचे असता तसे न होता एकमेकांवर ताशेरे ओढण्याचे काम या ठिकाणी झाले. इतर महापुरुषांचे स्मारके ही गावात होणे गरजेचे आहे व त्याची मागणी करणे रास्त असले तरी ती मागणी करण्याची किंवा म्हणने मांडणेची एक पद्धत असते ती पद्धत या ठिकाणी वापरली गेली नाही. व सदर ग्रामसभेला गालबोट लागले.
हि बाब खेदाची आहे सदरचा झालेला वाद गाव पातळीवरही मिटवता आला असता व सदरचा वाद गावपातळीवर मिटवण्याचा माझा प्रयत्न असफल झाला.
एकमेकांवर गुन्हे दाखल होण्याचे काम येथे झाले आहे वास्तविक पहाता मी एका चांगल्या राजकिय पक्षाचा पदाधीकारी म्हणून सदर घटनेची माझ्याकडे चौकशी होणे गरजेचे होते तसे या ठिकाणी झाले नाही याउलट मी ज्या पक्षात काम करत होतो त्या पक्षाच्या वरीष्ठ पदाधीकाऱ्यांनी माझ्यावरच आरोप करून मी प्रामाणेकपणे पक्षाचे काम करत असताना देखील मलाच गद्दारांच्या यादीत बसवण्याचा प्रयत्न झालेला आहे.
म्हणून मी सदर पक्षाच्या पदाचा राजीनामा देवून अलिप्त झालो आहे असे जाधव यांनी पत्रकार परीषदेत सांगितले पत्रकारांना सामोरे जातांना जाधव म्हणाले कि माझ्या गावाने या पुर्वी कधीही जातिभेद केला नाही. पुढेही भविष्यात करणार नाही याची मला खात्री आहे.
गावात सर्व समाजाच्या व्यक्तींनी मिळून मिसळून एकमेकांच्या विचारांत राहुन काम केलेले आहेत व करत आहेत.
सर्व ग्रामस्थांच्या सलोख्याने गावात शिवस्मारक व विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालयाचे काम पूर्ण केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही असेही जाधव म्हणाले
यावेळी सुरेश आप्पा निमसे, श्याम काका निमसे, सुनिल शिन्दे, सुभाष करपे, अन्ना सगळगिळे, ग्रा.प. सदस्य सुरेश करपे, गुलाबराव निमसे, ज्ञानदेव निमसे, सुभाष जगधने, गिरीष निमसे, लक्ष्मण सगळगिळे, शफीक शेख, प्रताप जाधव, अकबर सय्यद, भाऊसाहेब सगळगिळे, अरुण शिन्दे, अजिंक्य निमसे, कमालभाई शेख, सुरेश तोडमल, राजु सगळगिळे, भागवत नवाळे, चंद्रकांत सगळगिळे, राहुल चोथे, प्रताप निमसे, संदीप विधाटे, राजेंद्र निमसे, संतोष चोथे, आशोक करपे, रोहन भुजाडी, बन्टी गोसावी, जिजाभाऊ चिंधे आदींसह बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थीत होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे