बुद्धिबळ संघटनेच्या वतीने खेळाडूंच्या सरावासाठी व प्रशिक्षण चेस इंन स्कूलला प्राधान्य देणार – नरेंद्र फिरोदिया
अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेतर्फे 12 व 18 वर्षाखालील स्पर्धेचे उद्घाटन

अहमदनगर दि.7मार्च (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेतर्फे 12 व 18 वर्षाखालील बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटन नागर महाजनवाडी जुना कापड बाजार येथे अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया यांनी बुद्धिबळ पटावर चाल चालून केले. यावेळी अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सचिव यशवंत बापट, खजिनदार सुबोध ठोंबरे, विश्वस्त पारूनाथ ढोकळे, खेळाडू सुयोग वाघ, पंच मनीष जसवाणी, देवेंद्र ढोकळे, डॉ.स्मिता वाघ, अनुराधा बापट आदीसह पालक व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते. अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेतर्फे 12 व 18 वर्षाखालील बुद्धिबळ स्पर्धेमध्ये 45 खेळाडू सहभागी झाले या स्पर्धेचे प्रमुख पाहुण्यांचे स्वागत विश्वस्त पारुनाथ ढोकळे यांनी केले तर प्रमुख पाहुणे संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया म्हणाले की अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या माध्यमातून खेळाडूंसाठी घेत असलेल्या या विविध स्पर्धेबद्दल कौतुक करून खेळाडूंसाठी संघटनेच्यावतीने सरावासाठी प्रशिक्षण व चेस इन स्कूलला प्राधान्य देणार तसेच खेळाडूंनी मैदानी खेळाबरोबरच बुद्धिबळ खेळ सारखे खेळ खेळून आपल्या बुद्धीला चालना द्यावी व नगर जिल्ह्यात सगळ्यात जास्त ग्रँडमास्टर घडवण्याचा संघटनेचा नेहमी पाठबळ असून खेळाडूंनी चांगल्याप्रकारे बुद्धिबळ खेळ खेळावा. व जिंकणे हरणे हे चालू असते परंतु सर्वात महत्त्वाचे स्पर्धेमध्ये भाग घेणे व पालकांनी आपल्या पाल्याला प्रोत्साहन देऊन त्यांचा खेळ उंचावण्याच्या दृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे आहे.
खेळाडू सुयोग वाघ हा सर्बिया देशात खेळून आला असता त्याने तेथील ग्रँडमास्टर याला पराभूत केले व तेथील अनुभव खेळाडूंना सांगून संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविकात बुद्धिबळ संघटनेचे सचिव यशवंत बापट म्हणाले की अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या वतीने नागर महाजनवाडी जुना कापड बाजार येथे बोर्डवर ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत 25 खेळाडूंनी सहभाग घेतला असून या स्पर्धेतून निवड झालेले 2 मुले व 2 मुली हे पुणे व नाशिक येथे होणाऱ्या स्पर्धेत खेळणार आहे. अहमदनगर जिल्हा बुध्दीबळ संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया यांच्या पुढाकाराने विविध स्पर्धा खेळाडूंसाठी प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आले आहे व 22 ते 24 मार्च दरम्यान आंतरराष्ट्रीय मानांकन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये विविध स्पर्धेचे व बुद्धिबळ प्रशिक्षण स्पर्धेचे आयोजन संघटनेच्या मार्फत केले आहे. या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग घ्यावा असे आव्हान करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वस्त पारूनाथ ढोकळे यांनी केले तर आभार खजिनदार सुबोध ठोंबरे यांनी मानले.