प्रशासकिय

वंचितच्या पाठिंब्याचा धसका , ‘नगर बचाओ’ उपोषणात पडद्यामागे काय घडलं ? ‘नगर बचाओ’ उपोषणात नक्की काय घडलं ? वंचितकडून मनपाच्या कार्यशैलीवरच प्रश्नचिन्ह

अहमदनगर दि. १७ जुलै (प्रतिनिधी):- अहमदनगर महापालिका कार्यालयासमोर नगर शहरातील रहिवासी असलेले संतोष धुमाळ दिनांक १० जुलैपासून आमरण उपोषण सुरू केलेले होते. उपोषणकर्ते संतोष धुमाळ यांच्या मागण्या योग्य आणि व्यवहार्य वाटत असल्याकारणाने पहिल्याच दिवशीच त्यांना वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा जाहीर केला आणि त्यानंतर त्यांच्या उपोषणाची जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू झाली.शिलाविहार परिसरातील अतिक्रमण हटवावे तसेच मनपा अधिकाऱ्यांनी नियमबाह्य पद्धतीने दिलेल्या बांधकाम परवानग्या रद्द कराव्यात आणि रस्ताच गायब करणाऱ्या अधिकाऱ्याच्या चौकशीसाठी हे उपोषण सुरू करण्यात आलेले होते त्यानंतर शिलाविहार परिसरातील दोन भिंती पाडून टाकण्यात आल्या ज्या गरजेच्या होत्या मात्र याच दरम्यान उपोषणकर्ते असलेले संतोष धुमाळ यांचेच अतिक्रमण असल्याचा अजब दावा महापालिका अधिकाऱ्यांकडून दावा करण्यात आला आणि विशेष म्हणजे त्यांना कुठलीही लेखी नोटीस किंवा तोंडी देखील कल्पना न देता फक्त घरापुढे जेसीबी आणून उपोषण मागे घेण्याविषयी धमकावण्यात आले.महापालिकेच्या असल्या कार्यशैलीवर शहरात तीव्रसंताप व्यक्त केला जात असून प्रत्यक्षात संतोष धुमाळ यांचाही प्लॉट कमी भरत असून नगर शहरात अशाच पद्धतीने अनेक नागरिकांवर अन्याय होत असल्याचे वंचित बहुजन आघाडीने म्हटलेले आहे.
वंचित बहुजन आघाडीने या प्रकरणात अनेक दिवसापासूनच पाठपुरावा करीत असल्याकारणाने त्यानुसार संतोष धुमाळ यांच्या राहत्या घराचे बांधकाम हे १९९२ सालचे असून २००६ साली त्यांनी बांधकामासहित प्लॉट विकत घेतलेला होता. रजिस्टर खरेदी करण्यापूर्वी त्यांनी पेपरला नोटीसही दिलेली होती मात्र कुठलीही हरकत त्यावेळी आली नाही आणि १९९२ सालापासून तर आत्तापर्यंत त्यांना किंवा आधीच्या मालकाला कधीच कुठली नोटीसही आली नाही किंवा महापालिका अधिकाऱ्यांनी कधी त्यांच्या प्लॉटची मोजणी देखील केलेली नव्हती.उपोषणाला बसल्यानंतरच शासकीय यंत्रणाला जाग आल्याने त्यानंतर उपोषणकर्ते असलेले संतोष धुमाळ यांचाच आवाज दाबण्याचा उद्देशाने त्यांनाच अडकवण्यात आल्याची टीका महापालिका प्रशासनावर शहरात सुरु आहे.विशेष म्हणजे घर पाडण्यासाठी काढण्यात आलेल्या ऑर्डरची प्रत देखील संतोष धुमाळ यांना देण्यास अधिकारी ‘आमचे सिक्रेट डॉक्युमेंट’ आहे असे सांगत यावेळी सातत्याने नकार देत होते आणि मोबाईलमध्ये देखील कुठला फोटो घेऊ देत नव्हते.आपल्याकडे असलेली सर्व कागदपत्रे ही नियमित असल्याचा दावा संतोष धुमाळ यांनी केलेला आहे .
वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव योगेश साठे यांनी या प्रकरणी माहिती देताना, ‘१०जुलैपासून संतोष धुमाळ यांनी सुरु केलेल्या उपोषणाला मिळणारा नागरिकांचा पाठिंबा वाढत चालल्याने मनपा प्रशासनाने संतोष धुमाळ यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यासाठी यंत्रणेने हा प्रकार केलेला आहे.१० तारखेला मनपा अधिकाऱ्यांनी उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती मात्र संतोष धुमाळ यांनी यात उपोषणाचे फलित काहीही आढळून येत नसल्याने नकार दिलेला होता.मनपा अधिकाऱ्यांनी परिसरात २०२१ साली तुकाराम नावाच्या व्यक्तीच्या प्लॉटची केलेली मोजणी आणि ११ जुलै २०२३ रोजी केलेली मोजणी यामध्ये एका रात्रीत चक्क काही मीटरचा फरक रहस्यमयरित्या फरक आढळून आला. २०२१ साली मोजणीमध्ये तुकाराम याचे दक्षिणेकडील बाजूला अडीच मीटरचे अतिक्रमण आढळून आले होते तर संतोष धुमाळ यांचे कुठलेही अतिक्रमण यावेळी आढळून आले नव्हते मात्र दुसऱ्या मोजणीत चक्क संतोष धुमाळ यांचेच अतिक्रमण असल्याचा महापालिका अधिकाऱ्यांनी जावईशोध लावला.ज्या व्यक्तीला २०२१ मध्ये नोटीस पाठवण्यात आली त्याच्यावर दोन वर्षे उलटूनही कारवाई केली गेली नाही मात्र संतोष धुमाळ उपोषणाला बसल्यावर तीनच दिवसात कोणताच कागद किंवा नोटीस आणि तोंडी देखील माहिती न देता जेसीबी घेऊन घर पाडण्यासाठी अधिकारी इतके सक्रिय कसे होतात याला न्याय कसे म्हणता येईल. संतोष धुमाळ हे मला नोटीस पाठवा मी उत्तर देतो किंवा न्यायालयात जाण्यासाठी तरी वेळ द्या असे म्हणत असताना महापालिका अधिकाऱ्यांनी आम्हाला वरतून तुमचे घर पाडण्याचे आदेश आहेत असे सांगत त्यांना धमकावण्याची भाषा यावेळी केली असून मनपा अधिकारी यांचे वर्तन हे अक्षरश: गुंडाना लाजवेल असे होते,असे म्हटलेले आहे.
महापालिकेचे पथक तिथे आले तेव्हा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव योगेश साठे हे देखील यावेळी तिथे उपस्थित होते.त्यांनी महापालिका अधिकाऱ्यांना या प्रकरणी जाब विचारताना, ‘अवघ्या दोन वर्षात तुमच्याच जुन्या आणि नवीन रिपोर्टमध्ये फरक आढळून येत आहे असे विचारत भिंत आणि रस्ता अचानक अर्ध्या रात्रीत काही मीटर कसा सरकू शकतो? कुठलेही नवीन बांधकाम गेल्या दोन वर्षात संतोष धुमाळ यांनी केलेले नसताना एकट्या संतोष धुमाळ यांच्याच बाबत असा प्रकार कसा घडला? अशा आपल्या प्रकाराने शिलाविहारपासून तर तारकपूरच्या देखील पुढे सर्वच प्लॉट आणि रस्ते सरकतील मग सर्वांची घरे पाडणार का? असा देखील प्रश्न विचारला त्यावर महापालिका अधिकारी हे देखील निरुत्तर झालेले होते. महापालिका अधिकारी सातत्याने आमच्यावर वरून दबाव असून उपोषण करून त्यांनी आम्हाला खूप अडचणीत आणलेले आहे असे म्हणत होते.
जिल्हा महासचिव योगेश साठे यांनी याप्रकरणी मनपाच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याला फोन केला त्यावेळी त्यांनी सदर प्रकरणात आपण देखील संतोष धुमाळ यांचे प्रतिवादी आहात याची जाणीव करून दिली त्यावर या अधिकाऱ्याने सध्याच्या परिस्थितीत आम्हाला फक्त संतोष धुमाळ यांचे उपोषण हटवायचे आहे’ असे सांगत या प्रकरणावर अधिक बोलण्यास नकार दिलेला होता. महापालिकेच्या कार्यालयासमोर उपोषण केल्यानंतर उपोषण करत असलेल्या व्यक्तीलाच अडचणीत आणण्यासाठी हा सर्व प्रकार महापालिका अधिकाऱ्यांनी धमकावण्याच्या उद्देशाने केला की काय? अशी देखील शहरात चर्चा सुरू असून संतोष धुमाळ यांनी मनपाच्या या गुंडगिरीच्या विरोधात दुसऱ्याच दिवशी न्यायालयात दाद मागितलेली असून प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याकारणाने सद्य परिस्थितीत या प्रकरणावर बोलण्यास नकार दिलेला आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे