ब्रेकिंग
भिंगारनाला येथे पाण्याची पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया!

भिंगार दि.१२ नोव्हेंबर (प्रतिनिधी सुनिल भोसले) नगर भिंगार रस्त्यावर असणारा भिंगारनाला याठिकाणी पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन फुटली आहे. भिंगार शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या या पाईपलाईन मधून हजारो लिटर पाणी वाया जात आहे. एकीकडे भिंगारकर आठ दिवसांतून एकदा पाणी मिळते म्हणून वैतागून गेले असताना अशा प्रकारे हजारो लिटर पाणी वाया जाणे हे भिंगार येथील नागरिकांना संताप होण्यासारखेच यामुळे नागरिकांमध्ये कॅन्टोन्मेंट प्रशासन बाबत नाराजी व्यक्त होत आहे.
याबाबत आमच्या भिंगार प्रतिनिधींनी घेतलेली प्रतिक्रिया
**** कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या इंजिनिअर सोनवणे यांच्याबरोबर चर्चा केली असता त्यांनी एम एस आणि एमआयडीसी येथील संबंधितांना याबाबत माहिती कळवली आहे लवकरच पाइपलाइन दुरूस्तीचे काम सुरू होईल.
सोनवणे(इंजिनिअर) भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्ड