धार्मिक कार्यक्रमांमधून समाजामध्ये एकोप्याची भावना निर्माण होते – किरण काळे
महाशिवरात्रीनिमित्त काँग्रेसच्यावतीने भक्तांना दूध वाटप

अहमदनगर दि.४ (प्रतिनिधी ): नुकत्याच पार पडलेल्या महाशिवरात्रीनिमित्त काँग्रेस पक्षाच्या वतीने सिद्धार्थ नगर परिसरात कार्यक्रमाचे आयोजन करून शिवभक्तांना शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या हस्ते दुधाचे वाटप करण्यात आले. धार्मिक कार्यक्रमांमधून समाजातील विविध घटक एकत्र येतात. त्यामुळे समाजामध्ये एकोप्याची भावना निर्माण होते, असे प्रतिपादन यावेळी बोलताना काळे यांनी केले आहे.
प्रशांत जाधव, बिबीशन चव्हाण आदींच्या पुढाकारातून प्रभाग क्रमांक ९ मध्ये सिद्धार्थ नगर परिसरात काँग्रेसच्या वतीने दूध वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मनपाचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे, ओबीसी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनंतराव गारदे, विद्यार्थी काँग्रेसचे प्रभारी अनिस चुडीवाला, क्रीडा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रवीणभैय्या गीते पाटील, सागर चाबुकस्वार, शहर जिल्हा उपाध्यक्ष खलील सय्यद, शहर जिल्हा सचिव गणेश आपरे, गौरव घोरपडे, लखन गाडे, असलम सय्यद, राजु पटारे, गौतम म्हस्के, बिभीषण चव्हाण, संजु साठे, अक्षय म्हस्के, शंकर साठे, रमेश रणमले, मुक्तार सय्यद, रहयान सय्यद, हर्षद जाधव दिपक नवघरे, संदेश शिंदे, विशाल चव्हाण, दैवैन्द्र शेंदुरकर आदींसह काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवभक्त, भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना काळे म्हणाले की, भारतीय संस्कृतीला हजारो वर्षांचा इतिहास आहे. हिंदू धर्मामध्ये महाशिवरात्रीला अनन्यसाधारण महत्त्व असून हिंदू धर्मीयांमध्ये महाशिवरात्रीचा दिवस अत्यंत पवित्र व महत्त्वाचा समजला जातो. या दिवशी शिवभक्त मोठया प्रमाणावर आरती उपवास करतात. हिंदू धर्मा बरोबरच इतर धर्मातील लोक देखील यावेळी महादेवाचे दर्शन घेण्यासाठी मंदिरांमध्ये येत असतात.
यामुळे समाजामध्ये एकोप्याची भावना निर्माण होते. आजच्या एकूण सामाजिक स्थितीमध्ये अशा प्रकारची भावना धार्मिक कार्यक्रमांच्या निमित्ताने समाजामध्ये पाहायला मिळणे ही अत्यंत समाधानाची बाब आहे. महाशिवरात्रीचे औचित्य साधून प्रभाग ९ मधील कार्यकर्त्यांनी शिवभक्तांसाठी सिद्धार्थ नगर परिसरामध्ये दूध वाटप कार्यक्रम आयोजित करून हाती घेतलेला सामाजिक उपक्रम निश्चितच स्तुत्य व कौतुकास पात्र आहे. यावेळी तीनशेहून अधिक शिवभक्तांनी दूध वाटप कार्यक्रमाचा लाभ घेतला. यावेळी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.