जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत राहुरीतल्या या १४ गावांना मिळाली मान्यता- मंत्री तनपुरेंची माहिती

जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत राहुरीतल्या या १४ गावांना मिळाली मान्यता- मंत्री तनपुरेंची माहिती
बाळकृष्ण भोसले
राहुरी / प्रतिनिधी – जलजीवन मिशन कार्यक्रमाअंतर्गत राहुरी तालुक्यातील १४ गावातील योजनांना प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याची माहिती राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली
या पाणीपुरवठा योजनांसाठी सुमारे २१ कोटी २२ लाख ४० हजार रुपये खर्च येणार आहे. यामध्ये राहुरी तालुक्यातील चिंचोली ४ कोटी ८० लाख २२ हजार रुपये ,कोल्हार खु. ४ कोटी ८३ लाख ६७ हजार रुपये ,मल्हारवाडी ९१ लाख रुपये , घोरपडवाडी ४९ लाख रुपये , कानडगांव १ कोटी ६७ लाख ,वावरथ १ कोटी ७३ लाख ९७ हजार रुपये, निभेंरे १ कोटी १९ लाख रुपये , तुळापुर ५४ लाख रुपये , चिंचविहिरे ७६ लाख रुपये , गणेगांव १ कोटी २ लाख रुपये ,चांदेगांव १ कोटी १८ लाख रुपये , राहुरी खुर्द ६५ लाख रुपये ,देसवंडी ७१ लाख ९१ हजार रुपये ,शिलेगांव ७० लाख ६३ हजार रुपये खर्चाला प्रशासकिय मान्यता मिळालेली आहे लवकरच जल जीवन मिशन कार्यक्रमाद्वारे घरोघरी शुद्ध पिण्याच्या पाणी पुरवठा होणार असल्याचे मंत्री तनपुरे यांनी स्पष्ट केले. मागिल काही दिवसापुर्वी तालुक्यातील ११ गावांसाठी ७ कोटी ८२ लाख तसेच ब्राम्हणी व ७ गावाकरीता ५३ कोटी ८६ लाख रुपये मंजुरी झाले आहे. तसेच राहुरी विधानसभा मतदार संघात विविध विकास कामांची मालिका सुरूच ठेवलेली असून रस्ते ,वीज ,पाणी ,तलाव दुरुस्ती आदी कामांसाठी आपण नेहमीच प्रयत्नशील असल्याचे सांगत विज ,रस्त्याच्या व पिण्याच्या पाणी योजना कामांना सर्वाधिक प्राधान्य देण्यात आले असल्याचे मंत्री तनपुरे यांनी नमूद केले.