सामाजिक
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याबाबत उद्या भीमसैनिकांची बैठक
अहमदनगर (प्रतिनिधी) विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा नगर शहरातील मार्केटयार्ड या जागेत पूर्णाकृती पुतळा झाला पाहिजे.याबाबतीत दिनांक २१ फेब्रुवारीला शहरातील सर्व आंबेडकरी कार्यकर्त्यांची बैठक झाली.सदर बैठकीत महापालिका आयुक्त गोरे यांनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा व अनाधिकृत बांधकाम या संदर्भ मध्ये ३ मार्च रोजी होणाऱ्या कोर्टाच्या बाबतीत होणाऱ्या निर्णयावर मनपा प्रशासन सकारात्मक घेणार असल्याचे सांगितले. ३ मार्च रोजी कोर्टाच्या निर्णयावर निर्णय घेण्यासाठी तसेच विविध विषयांवर निर्णय घेण्यासाठी सर्व समाजबांधवानी उदया बुधवार ,दिनांक २ मार्च रोजी दुपारी १ वाजता सिद्धार्थ बुद्ध विहार ,सिद्धिबागे मध्ये सर्वानी उपस्थित रहावे असे आवाहन भीमसैनिकांच्या वतीने करण्यात आले आहे.