ईतरांनी केलेल्या विकास कामाचे श्रेय घेत नाही- कल्याणराव नेमाने
सभापती घुले यांच्या स्थानिक विकास निधीतुन पेव्हिंग ब्लॉकचे लोकार्पण

सभापती घुले यांच्या स्थानिक विकास निधीतुन पेव्हिंग ब्लॉकचे लोकार्पण.
बोधेगाव दि.१(प्रतिनिधी)-
शेवगाव तालुक्यामध्ये पंचायत समिती तसेच जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयाच्या विकासाची कामे घुलेच्या प्रयत्नामुळे आली आहेत. विकासाचा चढता आलेख पहाता ईतरांच्या पायाखालची वाळु सरकली असून ते आता सैरभैर झाले आहेत. तालुक्यामध्ये
ईतरांनी केलेल्या विकास कामाचे श्रेय आम्ही आत्तापर्यंत घेतले नाही आणि घेणार पन नाही असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शेवगांव तालुकाध्यक्ष कल्याणराव नेमाने यांनी केले.
शेवगांव तालुक्यातील नागलवाडी येथील काशीकेदारेश्वर मंदिराकरीता पंचायत समितीचे सभापती डॉ क्षितिज भैय्या घुले यांच्या स्थानीक विकास निधीतून मंदिर परिसरात साडेतीन लाखाचे पेव्हिंग ब्लॉक बसविण्यात आले होते दरम्यान या कामाचा लोकार्पण सोहळा महाशिवरात्रीच्या निमित्ताने आज काशी केदारेश्वर देवस्थानला करण्यात आल्यानंतर ते बोलत होते.प्राचीन परंपरा लाभलेल्या आणि अध्यात्मिक दृष्टीने संपन्न परंतु भौतीक दृष्टीने मागास असलेल्या काशीकेदारेश्वर देवस्थानसाठी भरिव निधीची आवश्यकता असताना. पंचायत समितीचे सभापती डॉ क्षितिज भैय्या घुले यांनी वाढदिवसानिमित्त देवस्थानला भेट दिली असता त्यांनी पहिल्याच भेटीत साडेतीन लाखाची मदत जाहीर केली आणि दि.२५ जानेवारीला या कामास सुरुवात करून ते थोड्या अवधीमध्ये पूर्ण देखील करण्यात आले. घुलेनी दिलेल्या शब्दाची प्रचिती परिसरातील नागरिकांना अल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
यावेळी काशी केदारेश्वर संस्थानचे मठाधिपती महंत बाबा गिरी महाराज, मार्केट कमिटीचे चेअरमन रामनाथ राजपुरे, राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष बाळासाहेब ढाकणे, खरेदी विक्री संघाचे चेअरमन एकनाथ कसाळ, माजी चेअरमन हनुमान पातकळ, क्षितिज घुले युवा मंचचे संतोष पावसे, अर्जुन दराडे, हरीश आंधळे, जयराम फुंदे, विठ्ठल अंधाळे , सोमनाथ अंधाळे, लक्ष्मण सानफ, राजेंद्र अंधाळे, शिवहरी अंधाळे सह ग्रामस्थ उपस्थित होते.