राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानतर्फे नुतन पदाधिकाऱ्याचा सन्मान

कर्जत प्रतिनिधी : दि २५
वडगाव तनपुरा (ता.कर्जत) येथे राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष युवा उद्योजक महेश तनपुरे व मित्र परिवारातर्फे प्रवीण घुले यांची जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी निवड यासह नगराध्यक्ष उषा राऊत, उपनगराध्यक्ष रोहिणी घुले, सिनथडी जत्रा व शिवजयंतीच्या यशस्वी नियोजनाबद्दल सकल मराठा समाज कर्जतचे प्रमुख समन्वयक धनंजय लाढाणे, कोंभळीच्या सरपंच शर्मिला गांगर्डे व कर्जत नगरपंचायतीचे नवनिर्वाचित नगरसेवक, नगरसेविका आदींचा सन्मान करण्यात आला. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, माजी जिप सदस्य मोहिनी घुले, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष सचिन घुले, सरपंच शुभांगी तनपुरे, पद्मसिंह तनपुरे, हौसराव तनपुरे, उद्योजक दीपक शिंदे, सुनील शेलार, प्रसाद ढोकरीकर, प्रा विशाल मेहेत्रे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना काँग्रेसचे प्रवीण घुले म्हणाले की, प्रवीण घुले म्हणाले, की महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि आमदार रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व नगरपंचायतीचे पदाधिकारी चांगले काम करतील. राजमाता जिजाऊ ग्रामविकास प्रतिष्ठानतर्फे सर्वांचा सन्मान झाला या सन्मानाने सर्वांची जबाबदारी आणखी वाढली आहे. तसेच यावेळी मनोगत व्यक्त करताना माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत म्हणाले, की आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली कर्जत नगरपंचायतीत राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडीने ऐतिहासिक विजय संपादन केला. महेश तनपुरे यांनी राजमाता जिजाऊ ग्रामविकास प्रतिष्ठानमार्फत कोरोना काळात उल्लेखनीय कार्य केले. त्यांच्या आजच्या सन्मानाने आमच्या सर्वांवर मोठी जबाबदारी असल्याचे अधोरेखित केले. कर्जतकर आणि तनपुरे कुटुंबियानी दिलेली जबाबदारी सर्व पदाधिकारी योग्य पार पाडतील अशी ग्वाही दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पद्मसिंह तनपुरे यांनी केले तर अविनाश तनपुरे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन निलेश दिवटे आणि ज्ञानेश्वर बरकडे यांनी पार पाडले.
यावेळी नगराध्यक्षा उषा राऊत, उपनगराध्यक्ष रोहिणी घुले, माजी जिप सदस्य मोहिनी घुले, गटनेते संतोष म्हेत्रे, उपगट नेते सतीश पाटील, नगरसेवक भाऊ तोरडमल, अमृत काळदाते, भास्कर भैलुमे, ताराबाई कुलथे, लंका खरात, मोनाली तोटे, सुवर्णा सुपेकर, छाया शेलार, प्रतिभा भैलुमे, ज्योती शेळके, मोहिनी पिसाळ व अश्विनी गायकवाड यांच्यासह मिलिंद तनपुरे, निलेश तनपुरे, शरद तनपुरे, काकासाहेब काकडे, विनोद दळवी, दिलीप तनपुरे, बाळासाहेब पांडुळे, कृष्णा लोखंडे, सचिन शेंडगे, पप्पू कचरे, अमोल भगत आदी उपस्थित होते.