देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क अहिल्यानगर, दि. 27 ऑगस्ट : काल-परवापर्यंत सतत म्हणत होतात की मी 31 ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त म्हणजे रिटायर्ड होणार!
हे आपल्या सर्वच मित्रांना मान्य होते कारण शासकीय नियमानुसार वयाच्या 58 व्या वर्षी सर्वच कर्मचारी सेवानिवृत्त होत असतात.
माऊली आपण आपल्या बहुजन शिक्षण संघाचे दादासाहेब रुपवते विद्यालय व ज्युनिअर कॉलेज अहिल्यानगर येथे तब्बल 31 वर्ष प्रामाणिकपणे विद्यार्थ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून अविरत सेवा केली. तुमचे असंख्य विद्यार्थी उच्च विद्या विभूषित होऊन चांगल्या उच्च पदावर कार्यरत आहेत. मित्रा तुझ्या आठवणी माझ्या व तुझ्या असंख्य मित्रांच्या मनात व काळजात निश्चितच जिवंत राहतील यात शंकाच नाही. तुझी व माझी मैत्री, नातेसंबंध हे तुमचे वडील व माझे मावसबंधू मोहन भाऊ पातारे यांच्यापासून, हे आजोळ तसे राहुरीचेच! तुमचे कुटुंब हे फुले, शाहू आंबेडकरी चळवळीतील तसेच समतावादी, परिवर्तनवादी व रिपब्लिकन चळवळीच्या विचारांना मानणारे हे विसरून चालणार नाही. तुमचे वडील दिवंगत श्रीराम इंगळे हे स्मृतीशेष रा.सू. गवई साहेबांच्या रिपब्लिकन पक्षाचे राहुरीचे तत्कालीन तालुका प्रमुख होते. वारसा तुम्ही जपत आलात, संघर्षमय अनेक अडीअडचणींना सामोरे जाऊन तुम्ही स्वतःचा व आपल्या संपूर्ण कुटुंबाचा सर्वांगीण विकास केला. तुमच्या असंख्य नातेवाईकांत तसेच समाजात व असंख्य मित्रांमध्ये तुमचा आदर्श तुम्ही तुमच्या सर्व गुण संपन्न स्वभावामुळे निर्माण केला. हे विसरून चालणार नाही. तुम्ही सामाजिक सांस्कृतिक धार्मिक राजकीय शैक्षणिक तसेच क्रीडा क्षेत्रात व इतरही विविध क्षेत्रात अतुलनीय कामगिरी केलेली आहे. तुमची ग्रंथसंपदा व वाचनाची आवड पाहून तुम्हाला नगर जिल्ह्यातील एक उत्कृष्ट वाचक म्हणून अहिल्यानगरच्या माननीय जिल्हाधिकारी यांच्या वतीने तुम्हाला पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेले आहे. गोरगरीब, हुशार व प्रामाणिक विद्यार्थ्यांना निराधार विद्यार्थ्यांना तुम्ही तुमच्या कॉलेजमध्येच आधार दिला नाही तर संगमनेरच्या आधार फाउंडेशनच्या मार्फत देखील असंख्य विद्यार्थ्यांना मदत केलेली आहे.
तुमची व्यायामाची आवड म्हणून तुम्ही स्वतः वैयक्तिक व्यायामशाळा सुरू करून असंख्य तरुणांना व्यायामाची आवड निर्माण केली ही बाब निश्चितच वाखाणण्यासारखी आहे. तुमचा हरहुन्नरी मुडी, आनंदी व सर्वांना सुखदुःखात बरोबर घेऊन जाण्याचा स्वभाव प्रत्येकाला यथाशक्ती मदत करण्याचा स्वभाव मी जवळून पाहिला आहे.
शैक्षणिक अडचणींमुळे तुम्ही अकोले भंडारदरा येथे अतिरिक्त झाला होता. परंतु आपल्या संस्थेशी असलेली एक निष्ठा पाहून तुम्ही पुन्हा आपल्या संस्थेत आला. भंडारदरा धम्म यात्रेच्या कार्यक्रमास तुमचा सहभाग व तदनंतर प्रत्येकाचा पाहुणचार हे विसरून चालणार नाही.
आदरणीय दिवंगत बाबूजी तथा प्रेमानंदजी रूपवते साहेब यांच्यावर तुमची आढळ श्रद्धा म्हणून तुम्ही तुमचे सहकारी प्रा. भीमराव पगारे, माजी प्राचार्य प्रा. शेख, प्रा. साबळे, दिवंगत प्रा. सुहास वाघमारे, माजी रजिस्ट्रार प्रा. व्ही. एम. बैचे सर यांच्या समवेत दिवंगत बाबूजींबरोबर महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर आपण अनेक दौरे केलेले आहेत.
आज सेवा निवृत्ती होत असताना वयाची 58 वी गाठताना तरुणांना लाजवेल अशी आपली शरीर एसटी व सुंदर व्यक्तिमत्व असेच चिरतरुण राहावे, शेवटी मित्र तुमच्या सेवानिवृत्तीनंतरचा काळ सामाजिक शैक्षणिक व कौटुंबिक जीवनातून जावो तसेच तुमची व्यायामाची व वाचनाची आवड जोपासित असताना आयुष्याच्या वळणावर तुम्ही तुमचे मौलिक क्षण लिहावेत. हीच एकमेव सदिच्छा बहुजन शिक्षण संघ या मातृसंस्थेविषयी नितांत आदर व्यक्त करताना तुम्ही शाळेला व कॉलेजला संपूर्ण संगणक संच भेट देत आहात ही अभिनंदननीय व गौरवपूर्ण बाब आहे. आपल्या संस्थेचे कार्यकारी विश्वस्त अॅडव्होकेट संघराज्य रुपवते साहेब व संस्था पदाधिकारी यांच्या नेतृत्वात आपली शैक्षणिक संस्था वाढावी मोठी व्हावी हाच तुमचा शुद्ध हेतू!
मित्रा तुझ्या सेवानिवृत्तीनंतरचा काळ आनंदाने सुखा समाधानाने जावो. आमच्या वहिनी साहेबांसोबत मुले, सुना नातवंडे व आमच्यासारख्या मित्रांच्या समवेत पुढील काळ जावो हिच एकमेव सदिच्छा! हिच एकमेव अभिलाषा!!
*शब्दांकन*
प्रा. जयंत गायकवाड मो.
नं. 7588115111
पर्यवेक्षक दादासाहेब रुपवते विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, अहिल्यानगर
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा