मोटारसायकल चोराला स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात!

अहमदनगर (प्रतिनिधी) मोटारसायकल चोरणाऱ्या चोरट्याला -स्थानिक गुन्हे शाखेने राहाता परिसरातून ताब्यात घेतले आहे.याबाबतची सविस्तर माहिती अशी की, स्थानिक गुन्हे शाखेने गजानन बाबुराव सोनवणे (रा. श्रीरामनगर, शिर्डी, ता. राहाता) या आरोपीला अटक केली आहे
.३० हजार रुपये किंमतीची होंडा कंपनीची मोटार सायकल अज्ञात चोरट्याने साकुरी शिवारातील साईपार्क, डी बिल्डींग, येथून चोरी नेल्याची तक्रार प्रकाश एकनाथ कदम यांनी राहाता पोलीस स्टेशनमध्ये दिली होती.
या तक्रारीनुसार भादविक ३७९ प्रमाणे गुन्हा राहता पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करत असताना हा गुन्हा गजानन सोनवणे याने केला असल्याची माहिती पोनि. अनिल कटके स्थानिक गुन्हे शाखा यांना गुप्त बातमीदाराकडून मिळाली.या माहितीनुसार पथकातील पोसई / सोपान गोरे, पोहेकॉ/ दत्तात्रय हिंगडे, पोना/ विशाल दळवी, शंकर चौधरी, ज्ञानेश्वर शिंदे, संदीप दरदंले, दिपक शिंदे, देवेंद्र शेलार, पोकॉ/ राहुल सोळुंके, विजय धनेधर चापोहेकॉ/बबन बेरड अशांनी आरोपीचा राहाता परीसरात शोध घेवुन आरोपीस अटक केली आहे.
त्याचाकडून गुन्हयाबाबत कसुन चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हया केल्याची कबुली देवुन गुन्हयातील चोरलेली मोटार सायकल समक्ष हजर केल्याने ती जप्त करुन ताब्यातील आरोपी व मुद्देमाल राहाता पोस्टे येथे समक्ष हजर केला. पुढील कारवाई राहाता पोस्टे.करीत आहे.सदरची कारवाई ही मनोज पाटील पोलीस अधीक्षक, स्वाती भोर अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर व संजय सातव उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी विभाग,यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.