सामाजिक

मोहरम सणाची मिरवणूक शांततेत संपन्न, हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन, मिरवणूक मार्गांवर अनेक ठिकाणी हिंदू बांधवानी केले बाराइमाम सवार्‍यांचे स्वागत! महाप्रसाद व शरबताचे वाटप! पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर, दि. 27 जून : संपूर्ण राज्यामध्ये अहिल्यानगर शहरातील मोहरम सणाची मिरवणूक ही प्रसिद्ध आहे. मोहरम या सणाला मोठी ऐतिहासिक परंपरा आहे. काल कोठला भागातून छोटे बाराइमाम मोठे बारा इमाम यांच्या सवाऱ्यांची मिरवणूक दुपारी दोन वाजता शहरातून काढण्यात आली. मिरवणूक मार्गावर अनेक ठिकाणी हिंदू बांधवांनी हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडवत बारा इमाम सवाऱ्यांचे आनंदाने खांदा देत, फुलांच्या चादरी टाकत, टाळ्या वाजवत स्वागत केले. मिरवणूक मार्गावर सर्व जाती-धर्माच्या नागरिकांसाठी महाप्रसाद तसेच शरबताचे वाटप करण्यात येत होते. नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कोणतेही गालबोट न लागता व कोणताही अनुचित प्रकार न होता. ही मिरवणूक शांततेत पार पडली.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे