गुन्हेगारी

अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 01 अवैध दारू विक्रेत्यांवर व 03 जुगार अड्यावर छापा 1,56,770/- रु कि.चा मुद्देमाल जप्त, अवैध धंदयावर स्थानिक गुन्हे शाखेकडून कारवाई

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क: अहिल्यानगर : दि. 24 जून :मा. श्री मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/श्री संतोष मुटकुळे यांना जिल्ह्यामधील अवैध व्यावसायिकांची माहिती काढुन कारवाई करणेबाबत आदेश दिलेले आहेत.
नमुद आदेशाप्रमाणे पो.नि. संतोष मुटकुळे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार अतुल लोटके, विष्णु भागवत, विजय पवार, गणेश लोंढे, रमिजराजा आत्तार, सागर ससाणे, बाळासाहेब गुंजाळ, अमोल आजबे, योगेश कर्डीले, चालक महादेव भांड, उत्तरेश्वर मोराळे अशांचे पथक तयार करून त्यांना अवैध धंदयाची माहिती काढुन कारवाई करणेबाबत सुचना देऊन पथक रवाना केले.
दिनांक 23/06/2026 रोजी पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी श्रीरामपुर शहर, श्रीरामपुर तालुका, अकोले या पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध दारू विक्रेत्यांची माहिती काढुन 01 ठिकाणी छापे तसेच अवैध जुगार अड्यावर 03 ठिकाणी छापे टाकुन कारवाईमध्ये अवैध दारू व जुगारीविरुध्द वरील पोलीस स्टेशनला एकुण 04 गुन्हे दाखल केले असुन 1,56,770/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
पोलीस स्टेशन निहाय अवैध दारु विक्री व जुगार अडे चालविणारे यांचेविरुध्द करण्यात आलेली कारवाई खालीलप्रमाणे.
अ.नं. पोलीस ठाणे दाखल संख्या जप्त मुद्देमाल किंमत
1 श्रीरामपुर तालुका (जुगार) 01 1,28,600/-
2 श्रीरामपुर शहर (जुगार) 01 2550/-
3 अकोले (जुगार) 01 20,740/-
4 श्रीरामपुर शहर (दारुबंदी) 01 4880/-
* एकुण 04 1,56,770/-
सदरची कारवाई मा. श्री. मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी केलेली आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे