ब्रेकिंग

कार चालकाला अडवून मारहाण करून अडीच लाखांची रोकड लुटणारी टोळी बेलवंडी पोलिसांकडून जेरबंद!

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर, दि. 23 जून : सविस्तर माहिती अशी की पुणे-अहमदनगर हायवेवरील गव्हाणवाडी शिवारात एका कार चालकाला रस्त्यात अडवून ६ ते ७ अज्ञात इसमांनी मारहाण करून त्याच्या जवळील ₹२,४७,०००/- (दोन लाख सत्तेचाळीस हजार) रुपयांची रोकड बळजबरीने काढून घेत पोबारा केला आहे. याप्रकरणी बैलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार बबन मल्हारी औटी (वय ४५, रा. खांदा कॉलनी, पनवेल, जि. रायगड) दिनांक १९ जून २०२६ रोजी सकाळी ते त्यांच्या मूळ गावी नांदा (ता. आष्टी, जि. बीड) येथे त्यांच्या इनोव्हा गाडीने आले होते. गावी काम आटोपून २० जून रोजी रात्री ११:३० च्या सुमारास ते पनवेलकडे परत जाण्यासाठी निघाले.
२१ जून २०२६ रोजी पहाटे ०१:३० वाजताच्या सुमारास त्यांची गाडी श्रीगोंदा तालुक्यातील गव्हाणवाडी गावच्या शिवारात ‘स्वामी समर्थ हॉटेल’ समोर आली. बबन ओटी हे लघुशंकेसाठी गाडी बाजूला उभी करून थांबले असता, अचानक तिथे ३ ते ४ अज्ञात इसम आले. त्यांनी “तू इथे गाडी का थांबवली?” अशी विचारणा करत थेट वाद घालण्यास सुरुवात केली व लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता त्यांनी यांच्या गाडीचा दरवाजा जबरदस्तीने उघडून गाडीच्या डॅशबोर्डमध्ये असणारी ₹२,४७,०००/- रुपयांची रोकड हिसकावून घेतली.
मारहाण झाल्यानंतर, आरोपींनी त्यांना त्यांच्याच गाडीत बसवले आणि गाडी शिरूरच्या दिशेने पळवली. व त्यांना तिथे सोडून दिले. आरोपी निघून गेल्यानंतर जखमी बबन ओटी *यांनी ‘११२’ या पोलीस हेल्पलाईन* क्रमांकावर संपर्क साधून मदतीची मागणी केली. बेलवंडी पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत त्यांना मदत केली. याप्रकरणी बबन ओटी यांच्या फिर्यादीवरून बेलवंडी पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यानंतर बेलवंडी पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर यांच्यासह तपास पथकातील अंमलदार यांनी आरोपी यांचा शोध सुरू केला. आरोपी शोध घेत असताना गोपनीय माहितीच्या आधारे व सदरचा गुन्हा हा आरोपी नामे सुरज अविदास ओहोळ राहणार पिंपरी कोलंदर , संकेत रमेश शेळके राहणार नारायण गव्हाण तालुका पारनेर, शुभम दिलीप गायकवाड राहणार गोलेगाव तालुका शिरूर जिल्हा पुणे, क्षितिज दादासाहेब ओहोळ, मयूर तुळशीराम ओहोळ, राहणार पिंपरी कोलंदर यांनी केला असल्याचे समजले. त्यानंतर सदर आरोपीचा शोध घेत असताना ते त्यांचे राहते घराच्या परिसरात मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे गुन्ह्याचे अनुषंगाने कसून तपास केला असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचे कबूल केलेने त्यांना अटक करण्यात आली आहे.
अटक आरोपींना मा . न्यायालयात हजर करून चार दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आली आहे.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास पीएसआय मोहन गाजरे हे करत आहेत.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री. मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कल्लूबरमे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली बेलवंडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर,पोलीस उपनिरीक्षक मोहन गाजरे, पोलीस हवलदार भाऊसाहेब यमगर, भाऊ शिंदे, पोलीस नाईक यशवंत ठोंबरे. पोलीस शिपाई विनोद पवार, दादा शिरसागर तसेच होमगार्ड यांनी केलेली आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे