खळबळजनक

पाथर्डी पोलीस स्टेशन वादाच्या भोवऱ्यात! एका महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न, एकाचा मृत्यू, आमच्या व्यक्तीचा पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू पिडीत महिलेचा आरोप 16 जणांवर गुन्हा दाखल

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : पाथर्डी:दि. 26मे : पाथर्डी पोलीस स्टेशन वादाच्या भोवऱ्यात सापडले असून पोलीस ठाण्यातच
एका महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला त्यात , एकाचा मृत्यू झाला आहे. या बाबत पिडीत महिलेने
आमच्या व्यक्तीचा पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाला असल्याचा गंभीर आरोप पाथर्डी पोलिसांवर केला आहे. याबाबतची विस्तृत माहिती अशी की,
सामूहिक अत्याचार झाल्याची फिर्याद पोलिस घेत नसल्याच्या कारणावरून सोमवार दि. 25 मे रोजी दुपारी पाथर्डी पोलीस ठाण्यासमोर एका महिलेने आपल्या मुलासह अंगावर ज्वलनशील द्रव्य ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी महिलेसोबत आलेल्या व्यक्तीचा जमिनीवर पडून मृत्यू झाला. विठ्ठल रावसाहेब खर्चन, वय 45, रा. आखेगाव, ता. शेवगाव, असे मृताचे नाव आहे.
तालुक्यातील एका गावातील महिला आपला मुलगा व विठ्ठल खर्चन यांच्यासोबत सोमवारी दुपारी पोलिस स्टेशनला आली होती. आपणावर सामूहिक अत्याचार झाला असे तिचे म्हणणे होते. मात्र, पोलिसांनी फिर्याद घेण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप आहे. त्यामुळे पीडितेने अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला.
त्याच वेळी त्यांच्या समवेत आलेले विठ्ठल खर्चन हे अचानक पोलिस ठाण्याच्या दारातच कोसळले. बराच वेळ त्यांच्याकडे कोणाचे लक्ष गेले नाही. त्यानंतर त्यांना पाथर्डी उपजिल्हा रुग्णालयात आणले असता, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेनंतर मयताच्या नातेवाइकांनी पाथर्डी पोलिस ठाण्याच्या आवारात गोंधळ घातला. पोलिसांवर गंभीर आरोप करीत उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली. फिर्यादी महिलेने आमच्या व्यक्तीचा पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप करीत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह एका लोकप्रतिनिधींना दोषी धरले.
उपजिल्हा रुग्णालयाच्या दारात आक्रोश सुरू असतानाच पीडित महिला बेशुद्ध पडली. उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. मनीषा खेडकर व कर्मचाऱ्यांनी त्यांना तातडीने उपचारासाठी दाखल केले. या घटनेनंतर अनेक संघटना उपजिल्हा रुग्णालयात जमा झाल्या होत्या. या घटनेचा तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांनी करण्याची मागणी होत आहे.
दरम्यान, पीडित महिलेच्या फिर्यादीनुसार औरंगपूर येथील 16 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनकर गंगाधर किलबिले, प्रभाकर सुधाकर किलबिले, कृष्णा सुधाकर किलबिले, सारंगधर उत्तम किलबिले, अमोल मच्छिंद्र कोठे, निखिल माने, जयदत्त उत्तम किलबिले, अभिषेक दिलीप किलबिले, दिलीप तुकाराम किलबिले, भीमराव ज्ञानदेव किलबिले, ईश्वर बापृूसाहेब देशमुख, सुभाष गोविंद किलबिले, आनंद भाऊसाहेब कासूळे, मनीषा सुधाकर किलबिले व तिचे वडील यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
आपणावर दोघांनी सामूहिक अत्याचार केला व त्यांना इतरांनी मदत केली, अशी महिलेची फिर्याद आहे. घराच्या बांधकामासाठी ठेवलेले तीन लाख रुपये चोरी केल्याचेही तक्रारीत नमूद केले आहे.एकंदरीतच पाथर्डी पोलिसांच्या कार्यशैलीवर पाथर्डी तालुक्यातील नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे