गुन्हेगारी

अवैध वाळु वाहतुक करणाऱ्यांविरूध्द गुन्हे स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई 3,20,000/- किंमतीचा मुद्देमाल हस्तगत

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर, दि. 18 मे : मा. श्री मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांचे आदेशान्वये पोनि/श्री. किरणकुमार कबाडी यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि/ संदिप मुरकुटे, पोलीस अंमलदार भगवान थोरात, रमीजराजा आत्तार, प्रकाश मांडगे, विशाल तनपुरे, चालक उत्तरेश्वर मोराळे यांचे पथक तयार करुन अवैध वाळु उपसा व वाहतुक करणारे इसमांविरुध्द कारवाई करणेकामी रवाना केले.
दिनांक 17/05/2026 रोजी रात्री स्थानिक गुन्हे शाखेचे पथक राहुरी पोलीस स्टेशन हद्दीमध्येे पेट्रोलिंग करुन अवैध धंद्याची माहिती काढत असतांना पथकास गुप्त बातमीदारामार्फत राहुरी शहरातील 18 एकर परिसरात एक इसम टेम्पोमध्ये चोरुन वाळुची वाहतुक करत असल्याची माहिती मिळाली.
पथकाने तात्काळ राहुरी शहरातील 18 एकर परिसरात जावुन सापळा रचुन थांबले असता. तेव्हा टेम्पो येतांना दिसली. पथकाने सदर टेम्पो थांबवुन चालकास ताब्यात घेवुन त्यास त्याचे नांव गाव विचारले असता त्याने त्याचे नांव 1) अकील कासम पठाम वय- 28 वर्षे रा.देसवंडी ता. राहुरी जि. अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले. सदर इसमास टेम्पोचे मालकाबाबत विचारपुस करता त्याने टेम्पोचे मालक 2) ओमकार संजय तनपुरे रा. तनपुरवाडी ता.राहुरी असे असल्याचे सांगितले
आरोपीचे कब्जातुन 20,000/- रु किमंतीची 2 ब्रास वाळु, 3,00,000/-रु किमतीची एक टाटा कंपनीची 407 टेम्पो, असा एकुण 3,20,000/- रु किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
ताब्यातील आरोपीविरुध्द राहुरी पोलीस ठाणे गु.र.नं. 541/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 303(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास राहुरी पोलीस ठाणे करीत आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कोठेही अवैध धंदे चालु असल्यास स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर येथील फोन नंबर 0241-2416111, डायल 112 यावर कळविणे बाबत नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे