सामाजिक

“सोनीयाच्या ताटी उजळल्या जोती, ओवाळते भाऊराया वेड्या बहिणीची ही वेडी माया ” रिपब्लिकन सेना महिला आघाडीने केले रक्षाबंधन

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क  : अहिल्यानगर : दि. 16 ऑगस्ट:” सोनीयाच्या ताटी उजळल्या जोती,ओवाळते भाऊराया वेड्या बहिणीची ही वेडी माया ” गाण्याच्या या ओळीप्रमाणे सर्वत्र भाऊ बहिणीचा पवित्र सण म्हणून रक्षाबंधन हा सण मोठया उत्साहात साजरा केला जातो.
अहिल्यानगर शहरातील बोल्हेगाव, गांधीनगर या भागातील चौभे कॉलनी येथे रिपब्लिकन सेनेच्या महिला आघाडीच्या वतीने नुकताच रक्षाबंधनाचा कार्यक्रम राबविण्यात आला.यावेळी याभागातील विविध प्रश्नावर चर्चा करण्यात आली. यावेळी पक्षाचे जिल्हा अध्यक्ष सुनील शिंदे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख महेश भोसले, गणेश परहार, रवींद्र उरुणकर, गणेश ढाकणे, प्रदीप घोरपडे, राहुल गायकवाड, महिला आघाडी शहर अध्यक्षा सुनीता शिंदे, उपाध्यक्षा नेहा जावळे, संघटक बेबीताई टकले, सविता कवडे, सविता काळे, संजीवनी राजपूत, अलका मैड, चंद्रकला जाधव, त्याचप्रमाणे महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे