सामाजिक

रिपब्लिकन सेनेने केले वीज महावितरण महामंडळाच्या विरोधात बोंबाबोंब आंदोलन सात दिवसाच्या आत नवीन कनेक्शन मिळाले नाही तर करणार उपोषण!

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क: अहिल्यानगर दिनांक 15ऑगस्ट: देश स्वातंत्र्य होऊन देखील उपनगरातील गांधीनगर, बोल्हेगाव, उघडा मारुती या बाजूला अनेक वर्षापासून लोक मूलभूत गरज समजल्या जाणाऱ्या विजेपासून आजही वंचित आहेत. याबाबत रिपब्लिकन सेनेने 15 ते 16 वर्षापासून महावितरण कार्यालयास याबाबत कळविले आहे. चोभे कॉलेनी परिसरात
1 65 कुटुंबांना आजही वीज कनेक्शन नाही संदर्भामध्ये अहिल्यानगर येथील महावितरण कार्यालयामध्ये बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. याबाबत परिसरामध्ये गेले अनेक वर्षापासून या भागामध्ये काही लोकांच्या माध्यमातून बेकायदेशीरपणे आकडा टाकून वीज वितरण केले जाते.याबाबत संबंधित व्यक्ती ही सदर कुटुंबीयांकडून 500 ते 600 रुपये प्रती महिन्याला घेतले जातात .वीज महामंडळाचे त्या भागातील वायरमेन यांना हाताशी धरून वीज पुरवठा बेकायदेशीरपणे चालू आहे. याबाबत रिपब्लिकन सेनेच्या वतीने नुकतेच बोंबाबोंब आंदोलन छेडण्यात आले. यावेळी रिपब्लिकन सेनेचे जिल्ह्याचे अध्यक्ष सुनील शिंदे त्याचप्रमाणे जिल्ह्याचे प्रसिद्धी प्रमुख महेश भोसले, युवक जिल्हाध्यक्ष, अतुल भिंगारदिवे, शहराच्या महिला अध्यक्षा सुनीता शिंदे, शहराच्या संघटक कविता कवडे, बेबीताई टकले, अलका मैड, चंद्रकला जाधव, निखिल यादव, सविता काळे,संजीवनी राजपूत,मोईन शेख,आदींनी वीज महावितरण मंडळाच्या कार्यालयासमोर नुकतेच बोंबाबोंब आंदोलन केले.यावेळी अतिरिक्त अधीक्षक अभियंता यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे. या भागातील लोकांना कायदेशीरपणे वीज देण्यात यावी.याबाबत जी काही तुमची कायदेशीर फी आहे ती देखील या भागातील नागरिक तयार आहेत. तरी आपण याबाबत गांभीर्याने दखल घेत येत्या आठ ते दहा दिवसात सदर भागातील नागरिकांना वीज उपलब्ध करून द्यावी. आठ ते दहा दिवसांमध्ये उपलब्ध वीज उपलब्ध झाली नाही तर रिपब्लिकन सेनेच्या वतीने परिसरातील नागरिकांच्या समवेत वीज महावितरणच्या कार्यालयावर उपोषण करण्यात येईल असा इशारा सदर निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे.यावेळी विज वितरण कार्यालयाचे अतिरिक्त अभियंता यांनी लवकरात लवकर या भागातील लोकांना वीज वितरित केली जाईल. असे आश्वासन देण्यात आले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे