देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क: अहिल्यानगर: दि. 4 ऑगस्ट: लोकशाहीर साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा अहिल्यानगर महानगरपालिकेच्या प्रशासकीय जागेत किंवा सक्कर चौकात उभारण्याची मागणी शिवसेना शहरप्रमुख सचिन जाधव यांनी शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह महापालिका आयुक्तांकडे दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
जुना आप्पू हत्ती चौक, लालटाकी परिसरातील अस्तित्वात असलेल्या अर्धाकृती पुतळ्याजवळ किंवा सक्कर चौकात भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा, जेणेकरून डॉ. साठेंच्या विचारांचा वसा नव्या पिढीपर्यंत पोहोचेल, अशी भावना शहरप्रमुख सचिन जाधव यांनी व्यक्त केली आहे.
विशेष म्हणजे, या स्मारकासाठी लागणारा निधी मिळावा म्हणून थेट महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडेही प्रस्ताव पाठवण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.यावेळी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा अध्यक्ष अनिल शिंदे, माजी महापौर तथा माजी गटनेते संजय शेंडगे, माजी नगर सेवक सचिन शिंदे, प्रशांत गायकवाड, सुरेश तिवारी, अशोक दहिफळे, संतोष ग्यानप्पा, रिपब्लिकन सेनेचे जिल्हा अध्यक्ष सुनील शिंदे, प्रसिद्धी प्रमुख महेश भोसले, पोपट पाथरे, राम वडागळे, विनोद शिरसाठ, दिपक खैरे,अरुण झेंडे, सुनीता बहुले, गणेश वाघचौरे आदी उपस्थित होते.
या निवेदनावर शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी सह्या करून पाठिंबा दर्शवला असून, यामध्ये स्थानिक कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध घटकांचे प्रतिनिधी सामील होते.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा