महाराष्ट्र

लता मंगेशकरांनी आंबेडकरांची गाणी गायली नाही, हे त्या जिवंत असताना विचारायला हवं होतं:प्रकाश आंबेडकर

त्यांनी सरदार पटेल आणि नेहरुंचीही गाणी गायली नाहीत!

मुंबई : रविवारी लता मंगेशकर यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर दिग्गजांनी लता मंगेशकर यांच्या गाण्याचं , त्यांच्या संगीत क्षेत्रातील योगदानाचं भरभरुन कौतुक करत त्यांना आदरांजली वाहिली होती. प्रकाश आंबेडकर यांनी देखील लता मंगेशकर यांना आंदरांजली वाहिली आहे.
लता मंगेशकर यांनी आंबेडकरांची गाणी गायली नाही याबाबत त्यांना विचारण्यात आलं. यावर लता मंगेशकरांनी आंबेडकरांची गाणी गायली नाही, हे त्या जिवंत असताना विचारायला हवं होतं, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय. इतकंच काय तर जशी त्यांनी आंबेडकरांची गाणी गायली नाहीत, तशीच त्यांनी सरदार पटेल आणि नेहरुंचीही गाणी गायली नाही, असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय.
मैदानावर खेळ खेळले जावेत, स्मारकाकरता इतर अनेक जागा आहेत असंही प्रकाश आंबेडकर म्हणालेत. लतादीदींचं स्मारक शिवाजी पार्कमध्ये करा अशी मागणी भाजपनं केली आहे. यावर बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
शिवाजी पार्कची स्मशानभूमी करु नका असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.
सोबतच शिवाजी पार्क हे शिवाजी पार्कच रहावं, त्याची स्मशानभूमी करु नये, असाही टोला प्रकाश आंबेडकर यांनी लगावला आहे. तसंच सोशल मीडियावर लोकांनी ट्रोल करण्याचं घाणेरडं काम करणाऱ्यांचाही प्रकाश आंबेडकर यांनी निषेध नोंदवलाय.
दरम्यान, शाहरुख खानच्या फुंकरवरुनही त्याला ट्रोल करणाऱ्यांना प्रकाश आंबेडकर यांनी प्रत्युत्तर दिलंय. त्यांनी म्हटलंय की, मी मुस्लिम व्यक्तींच्या प्रेतयात्रेला मी गेलोय, असं त्यांनी सांगितलं.
मी बघितलंय की अनेक ठिकाणी फुंकर घातली जाते. हे देशाचं वैविध्यपूर्ण कल्चर आहे. ते स्वीकारायलाच हवं! ज्यांना पटत नसेल त्यांनी शांत रहावं, असा सल्लाही प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे