ब्रेकिंग

“चला निळ्या निशाणाखाली”……… डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा अनावरण सोहळा विराट भिमशक्तीचे विराट दर्शन घडवू या!

 

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर : दि. 26 जुलै : ऐतिहासिक अहमदनगर (जुने ) व आताचे अहिल्यानगर हे पण ऐतिहासिकच बरं! शहरातील मार्केटयार्ड चौकातील जुन्याच ठिकाणी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण रविवार दि. 27 जुलै 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता संपन्न होत आहे. या ऐतिहासिक सोहळ्याला आंबेडकरी समाजाच्या चळवळीत अत्यंत मोलाचे व महत्वपूर्ण स्थान आहे. गेल्या 40 वर्षापासून डॉ. आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा शहरात असावा अशी समस्त आंबेडकरी जनतेची व शहर वासियांची मनापासून ईच्छा होती. ती इच्छा आता खऱ्या अर्थाने पूर्ण होत आहे. याचा सर्वांना मनस्वी आनंदच आहे. पूर्णाकृती पुतळा पूर्ण करण्यासाठी अनेक विघ्नसंतोषी महान विभूतीनी विरोध तर केलाच, अनेक कायदेशीर अडचणी निर्माण केल्या. अनेक सामाजिक, राजकीय संघटना व पक्षांनी पुतळा होण्याचा खोटा आव आणून देखावा देखील केला. परंतु सच्या भिम सैनिकांनी निकराचा व अखंड लढा दिला. संघर्षाची लढाई खऱ्या अर्थाने जिंकणार नाहीत ते प्रामाणिक आंबेडकरवादी भीमसैनिक नसतील तर कसे?त्यांच्या कार्यास सलाम करणे हे मी व समस्त चळवळी चे कर्तव्य समजतो उमदे आंबेडकरवादी भीमसैनिक युवा नेते सुरेशभाऊ बनसोडे, सुमेधभैय्या गायकवाड, किरणभाऊ दाभाडे, कौशल गायकवाड, अमित काळे, रोहित आव्हाड, अंकुश मोहिते, विनोद भिंगारदिवे, संदीप वाघमारे, सिद्धार्थ आढाव, संजय साळवे, महिला आघाडीच्या गौतमीताई भिंगारदिवे, जयाताई, हिराबाई भिंगारदिवे,गायकवाड, तसेच ज्ञात, अज्ञात अनेक युवा नेत्यांचे सहकार्य होतेच.
या युवा नेत्यांना खऱ्या अर्थाने समय सूचकता पाळून जेष्ठ नेते अशोकराव गायकवाड, संभाजीराव भिंगारदिवे,विजयराव भांबळ, जेव्हीयर भिंगारदिवे, अजयराव साळवे, सुनील शिंदे, सुनील क्षेत्रे,महेश भोसले, नितीन कसबेकर, विलास साठे सर, प्रा. डी. आर. जाधव, रवींद्र कांबळे, सुरेशराव भिंगारदिवे, संजय जगताप, पोपटराव जाधव, असंख्य जेष्ठ नेत्यांनी सहकार्य केले.
आंबेडकरी चळवळीतील पुरोगामी, परिवर्तनवादी चळवळीतील अनेक सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, राजकीय, सांस्कृतिक, विध्यार्थी संघटना यांचे देखील मोलाचे योगदान आहेच.
विशेष म्हणजे आमचे स्नेही चळवळीचे अभ्यासक, महानगर पालिकेचे जल अभियंता, परिमलजी निकम,यांनी महानगर पालिकेच्या सर्व कायदेशीर बाबी पूर्ण केल्या. त्यांना खऱ्या अर्थाने आयुक्त यशवंत डांगे यांनी मोलाची साथ दिली. त्यांच्या विषयी समाज नेहमीच कृतज्ञता व्यक्त करील.कोणतीही चळवळ खऱ्या अर्थाने पुढे न्यायची असेल तर त्या चळवळी तसा खमक्या, भक्कम नेता असावा लागतो, साम, दाम, दंड, भेद सर्व नीती वापरून कशाची तमा न बाळगता शासन दरबारी पाठपुरावा करण्याचे काम कार्यसम्राट आमदार संग्राम भैय्या जगताप यांनी केले. यामध्ये कै. माजी आमदार कै.अरुणकाका जगताप त्यांची मोलाची साथ मिळाली. आंबेडकरी चळवळीच्या वतीने व अहिल्यानगर वासियांच्या वतीने त्रिवार आभार व्यक्त करणे हे महत्वाचे ठरते. हा सर्व लेखन लेखन खटाटोप करतांना जुन्या आठवणींना देखील मानाचा मुजरा केलाच पाहिजे. पूर्णाकृती पुतळा व्हावा यासाठी ज्यानी खऱ्या अर्थाने चळवळ सुरु केली.असे रिपब्लिकन – पँथर्स चळवळी तील स्मृतीशेष बाळासाहेब चव्हाण, भैय्यासाहेब गायकवाड, शरदभाई गायकवाड, विजयकांत चाबूकस्वार, माजी नगरसेवक शँकरराव भांबळ, प्रभाकरराव रुपवते, कॉ. भास्करराव जाधव, ऍड. एम. व्ही. साठे, लक्ष्मण सांभागळे, दा. भि. गायकवाड गुरुजी, वसंतराव म्हस्के, अप्पासाहेब भिंगारदिवे, संतराम साळवे, नंदराम साळवे, अनिल भोसले, ठकसेन साळवे, यांचे स्वप्न युवा पिढी पूर्ण करत असल्याचा आम्हाला सार्थ आभिमान आहे.

27 जुलै 1978 रोजी महाराष्ट्र विधी मंडळात “डॉ. बाबासाहेब आंबेडकर विदयापीठ ” हा नामांत्राचा ठराव मंजूर झाला, त्याच ऐतिहासिक दिनाचे औचित्य साधत उद्या 27 जुलै रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा अनावरण सोहळा संम्पन्न होत आहे.सोहळयाचे स्वागत अध्यक्ष तथा आमदार संग्राम जगताप हे असून हा सोहळा राज्याचे उपमुख्यमंत्री मंत्री व अर्थमंत्री आजीत दादा पवार यांच्या प्रमुख उपस्थिती व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संम्पन्न होत आहे. या ऐतिहासिक सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून भन्तेजी डॉ. राहुल बोधी, नामदार रामदासजी आठवले, माजी खासदार प्रा. जोगेंद्रजी कवाडे, मा. आनंदराजजी आंबेडकर, भीमरावजी आंबेडकर, खासदार चंद्रकांतजी हंडोरे, जयदीपजी कवाडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.या महासोहळ्यात सुप्रसिद्ध कवी भिमगीतकार आनंदजी शिंदे यांचा “शिंदेशाही ” गायनाचा कार्यक्रम होणार आहे. या ऐतिहासिक महा सोहळ्यास सर्वांना आपसातील मनभेद, मतभेत, बाजूला ठेऊन मानी, स्वाभिमानी, सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी, अबाल वृद्ध, महिलांनी , या कौटुंबिक सोहळ्याचे साक्षीदार व्हावे. विराट भिम शक्तीचे विराट दर्शन घडवावे हिच एकमेव अपेक्षा!जय शिवराय! जय भिम!! जय संविधान!!!

लेखक : प्रा. जयंत गायकवाडराज्य सचिव पीपल्स रिपब्लिकन पार्टीडॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा समिती सदस्य, अहिल्यानगर.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे