सामाजिक

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण 27 जुलै रोजीच होणार : आयुक्त यशवंत डांगे

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : दि. 16 जुलै :अहिल्यानगर : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा अनावरण सोहळा 27 जुलै रोजी होणार नाही याबाबत असा संदेश काही लोकांनी आंबेडकरी समाजात जाणीवपूर्वक पसरविल्यामूळे बहुजन समाज, व आंबेडकरी समाजामध्ये गोधळ निर्माण झाला होता.
या अनुषंगाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा समिती संपूर्ण आंबेडकरी समाजाच्या वतीने महानगर पालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांची भेट घेऊन 27 जुलै 1978या ऐतिहासिक दिवशी महाराष्ट्राच्या विधानसभेत मराठावाडा विदयापीठास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे, हा ठराव मंजूर करण्यात आल्याने या दिवसाला एक वेगळे महत्व असल्याचे सांगण्यात आले. यावेळी आंबेडकरी जनतेच्या भावनांचा आदर करत आयुक्त डांगे यांनी 27 जुलै 2025 रोजीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण मोठया जल्लोषपूर्ण वातावरणात करण्यात येईल, असा शब्द डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा समिती व आंबेडकरी समाजाला देण्यात आला. यावेळी बहू संख्येने बहुजन समाज व आंबेडकरी समाज बांधव उपस्थित होते.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे